मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : खनिज तेलाच्या किंमती झाल्या कमी, पाहा आजचे पेट्रोल डिझेलचे दर

Petrol Diesel price today : खनिज तेलाच्या किंमती झाल्या कमी, पाहा आजचे पेट्रोल डिझेलचे दर

May 09, 2023, 08:39 AM IST

    • Petrol Diesel price today 09 May 2023 : कच्च्या तेलाच्या दरात आज थोडीशी घसरण झाली आहे. इथे भारतात बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
petrol pump HT

Petrol Diesel price today 09 May 2023 : कच्च्या तेलाच्या दरात आज थोडीशी घसरण झाली आहे. इथे भारतात बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

    • Petrol Diesel price today 09 May 2023 : कच्च्या तेलाच्या दरात आज थोडीशी घसरण झाली आहे. इथे भारतात बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Petrol Diesel price today 09 May 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज थोडीशी घसरण झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड ०.२७ टक्क्यांनी घसरून ७२.९६ डाॅलर्स प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड ०.३१ टक्क्यांच्या घसरणीसह ७६.७७ डाॅलर्सवर विकले जात आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. जून २०१७ पूर्वी दर १५ दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती.

ट्रेंडिंग न्यूज

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

Business Ideas : कर्ज हे नेहमीच वाईट नसतं; 'मसाला किंग' धनंजय दातार सांगतायत स्वानुभव

WhatsApp News : व्हॉट्सॲपचं रंग, रूप बदललं! नव्या बटणांनी दिला आकर्षक लुक, तुम्ही पाहिला का?

देशातील बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही चढ-उतार झालेला नाही. मात्र, दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये दरात बदल नक्कीच आहे. महाराष्ट्रात पेट्रोल ४० पैशांनी तर डिझेल ३९ पैशांनी महागलं आहे. त्याचबरोबर तामिळनाडूमध्येही पेट्रोल आणि डिझेल २५ पैशांनी महागले आहे. केरळमध्येही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. तेलंगणामध्ये ते स्वस्त झाले आहे. त्याचवेळी, उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित वाढ झाली आहे.

देशातील विविध शहरांतील पेट्रोल डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

- कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

विभाग