मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger stocks : आज एनटीपीसी, टाटा मोटर्स, फेडरल बँकेसह हे शेअर्स आहेत मल्टिबॅगर्स, नजर ठेवा!

Multibagger stocks : आज एनटीपीसी, टाटा मोटर्स, फेडरल बँकेसह हे शेअर्स आहेत मल्टिबॅगर्स, नजर ठेवा!

Jan 17, 2023, 12:20 PM IST

    • Multibagger Stocks :  सकारात्मक संकेतांमुळे काही शेअर्स आज फोकसमध्ये असतील. तुम्ही इंट्राडेमध्ये चांगले स्टॉक शोधत असाल तर ‘हे’ स्टाॅक्स चांगला परतावा देतील. 
Multibagger stocks HT

Multibagger Stocks : सकारात्मक संकेतांमुळे काही शेअर्स आज फोकसमध्ये असतील. तुम्ही इंट्राडेमध्ये चांगले स्टॉक शोधत असाल तर ‘हे’ स्टाॅक्स चांगला परतावा देतील.

    • Multibagger Stocks :  सकारात्मक संकेतांमुळे काही शेअर्स आज फोकसमध्ये असतील. तुम्ही इंट्राडेमध्ये चांगले स्टॉक शोधत असाल तर ‘हे’ स्टाॅक्स चांगला परतावा देतील. 

Multibagger Stocks: आज म्हणजेच १७ जानेवारी २०२३ रोजी काही शेअर्स अस्थिर बाजारात चांगला परफाॅर्मन्स दाखवण्यासाठी सज्ज आहेत. सकारात्मक संकेतांमुळे हे शेअर्स आज मार्केटमध्ये फोकसमध्ये राहू शकतात. तुम्ही इंट्राडेमध्ये चांगले स्टॉक शोधत असाल तर तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

Business Ideas : दिमाग मेरा, पैसा तेरा...

ITR भरतांना ‘या’ चुका करणे पडेल महागात! हातात पडेल नोटीस अन् भरावा लागेल दंड; वाचा

Export duty on onion : कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४० टक्के निर्यात शुल्क लागू

आजच्या यादीत एनटीपीसी, बँक ऑफ इंडिया, टाटा मेटालिक्स, सुला वाईनयार्ड्स, फिनिक्स मिल्स, टाटा मोटर्स, बँक ऑफ महाराष्ट्र, फेडरल बँक, सीमेन्स, अशोका बिल्डकॉन, ड्रोन आचार्य, आयसीआयसीआय लोम्बार्ड जीआयसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, डेल्टा कॉर्प, एरिस लाइफसायन्स, हॅथवे केबल, मासटेक मेट्रो ब्रँड्स, न्यूजेन सॉफ्टवेअर, टाटा मेटॅलिक सारख्या शेअर्सचा समावेश आहे. त्यापैकी काहींनी व्यवसाय वाढवण्यासाठी काही पावले उचलली आहेत, तर काहींना मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. काहींमध्ये बड्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे तर काहींमध्ये भागविक्री दिसून आली.

बँक आॅफ इंडिया

आज म्हणजेच १७ जानेवारी २०२३ रोजी बँक ऑफ इंडियाचे त्रैमासिक निकाल येतील, ज्यामुळे स्टॉक फोकसमध्ये राहू शकतो. याशिवाय आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी, डेल्टा कॉर्प, एरिस लाइफसायन्स, हॅथवे केबल अँड डेटाकॉम, मास्टेक, मेट्रो ब्रँड्स, न्यूजेन सॉफ्टवेअर आणि टाटा मेटॅलिक यांचे निकालही जाहीर होत आहेत.

एनटीपीसी

त्रिपुरा सरकारने एनटीपीसीसोबत सामंजस्य करार केला आहे. कंपनी त्रिपुरामध्ये मोठ्या प्रमाणात अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करणार आहे.

टाटा मेटलिक्स

माॅर्गन स्टेनलेने खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे टाटा स्टीलची उपकंपनी टाटा मेटलिक्समध्ये १.९८ लाख शेअर्सची खरेदी केली आहे. हे शेअर्स सरासरी ८३४.६७ रुपये प्रति शेअर या दराने खरेदी करण्यात आले आहेत.

सुला व्हाइनयार्ड्स

क्वांट म्युच्युअल फंडाने खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे वाइन निर्माता सुला विनयार्ड्सचे १ दशलक्ष शेअर्स खरेदी केले आहेत. या शेअर्सची सरासरी खरेदी किंमत ३६१.८२ रुपये प्रति शेअर आहे.

फिनिक्स मिल्स

फिनिक्स मिल्सच्या उपकंपनीने जेनस लॉजिस्टिक आणि इंडस्ट्रियल पार्क्समध्ये १००% इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. त्यामुळे हा शेअर्सही आज चर्चेत राहू शकतो.

टाटा मोटर्स

टाटा मोटर्सने २०२२ मध्ये ५ लाख एकत्रित होलसेलचा टप्पा ओलांडला आहे. नवीन लाँच तसेच कंबस्चन इंजिन मॉडेल्स, इलेक्ट्रिक वाहने आणि सीएनजी ट्रिम्ससाठी सुधारित ट्रॅक्शनच्या आधारे या वर्षी जोरदार कामगिरी करणे अपेक्षित आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र

तरतुदींमध्ये झालेली घसरण आणि निव्वळ व्याज उत्पन्नातील मजबूत वाढ यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रचा निव्वळ नफा डिसेंबर तिमाहीत वार्षिक तुलनेत दुप्पटीने वाढून रु. ७७५ कोटी झाला आहे. तरतुदी आणि आकस्मिकता वार्षिक आधारावर ३०.४ टक्क्यांनी घसरून ५८० कोटी रुपयांवर आल्या.

फेडरल बँक

फेडरल बँकेचा नफा वार्षिक ५४ टक्क्यांनी वाढून ८०३.६१ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत बँकेचा नफा ५२१.७३ कोटी रुपये होता. तरतुदी आणि आकस्मिकता ७.१ टक्क्यांनी घसरून १९८.६९ कोटी रुपयांवर आल्या. एनआयआय सुमारे २७ टक्क्यांनी वाढून १९५६ कोटी झाला.

विभाग