मराठी बातम्या  /  बिझनेस  /  गतवर्षीच्या दसऱ्यास ४४ स्मॉल कॅप कंपन्यात गुंतवणूक करणारे या दसऱ्यास झाले मालामाल

गतवर्षीच्या दसऱ्यास ४४ स्मॉल कॅप कंपन्यात गुंतवणूक करणारे या दसऱ्यास झाले मालामाल

Oct 05, 2022, 06:46 PM IST

  • गत वर्षीच्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शेअर बाजारातील ज्या  ४४ स्मॉलकॅप शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी आपली रक्कम गुंतवली, ते या दसऱ्याला मालामाल झाले आहेत. कारण त्यांना या शेअर्समुळे एका वर्षाच्या कालावधीत घसघशीत परतावा मिळाला आहे. 

investment in stocks HT

गत वर्षीच्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शेअर बाजारातील ज्या ४४ स्मॉलकॅप शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी आपली रक्कम गुंतवली,ते या दसऱ्याला मालामाल झाले आहेत. कारण त्यांना या शेअर्समुळे एका वर्षाच्या कालावधीत घसघशीत परतावा मिळाला आहे.

  • गत वर्षीच्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शेअर बाजारातील ज्या  ४४ स्मॉलकॅप शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी आपली रक्कम गुंतवली, ते या दसऱ्याला मालामाल झाले आहेत. कारण त्यांना या शेअर्समुळे एका वर्षाच्या कालावधीत घसघशीत परतावा मिळाला आहे. 

खरे तर,यावेळी व्यापक स्तरावरचे आर्थिक वातावरण आणि वाढत्या व्याजदराशी संबंधित चिंतेमुळे या कालावधीत सेन्सेक्स ६ % पेक्षा जास्त अंशांनी घसरला. तरीही या शेअर्सची कामगिरी कौतुकास्पद म्हटली पाहिजे . उदाहरणार्थ आय टी एनेबल्ड सर्व्हिसेस ( आय टी ई एस ) क्षेत्रातील क्रेसांडा सोल्युशन्स कंपनीचा शेअर . याचे बाजारपेठीय भांडवल १४०० कोटी रुपयांपेक्षा क्षा कमी आहे. पण २०२१ च्या दसऱ्या पासून स्मॉलकॅप जगतात तो अव्वल स्थानावर आहे,सुमारे १५०० % च्या उत्साहवर्धक रॅलीसह हा शेअर २ रुपयांवरून ३४ रुपयांवर गेला.

ट्रेंडिंग न्यूज

Ducati Hypermotard 950 RVE: डुकाटी हायपरमोटार्ड ९५० आरव्हीई नव्या लूकसह बाजारात लॉन्च

Realme C65 5G: रियलमी सी६५ 5G भारतात लॉन्च; अवघ्या १२ हजारांत मिळवा उत्कृष्ट कॅमेरा आणि दमदार बॅटरी

Business Ideas : थेंबे थेंबे तळे साचे... उद्योगउभारणी आणि बचतीचे महत्व

whatsapp : …तर भारतात व्हॉट्सॲप बंद होणार; केंद्र सरकारच्या आदेशानंतर कंपनीचा आक्रमक पवित्रा

केपीआय ग्रीन एनर्जी च्या शेअर्सने देखील या कालावधीत तडाखेबंद फलंदाजासारखी उत्तम कामगिरी केली .त्याच्यात जवळपास ५०० % ची वाढ झाली आहे तर ज्योती रेजिन्स अँड अँडेसिव्हज,मिर्झा इंटरनॅशनल आणि ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्सने ३७५ ते ४२४ % पर्यंत नफा कमावला आहे.

इतर स्मॉलकॅप्स जे या कालावधीत दुप्पट झाले,त्यामध्ये चॉईस इंटरनॅशनल,साधना नायट्रो केम,फिनोटेक्स केमिकल,डीबी रियल्टी,लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीज,शॉपर्स स्टॉप,राजरतन ग्लोबल वायर आणि टीजीव्ही एसआरएसीसी यांचा समावेश आहे.

खालील शेअर्सही वधारले

शेअर  परतावा
शिवालिक बायमेटल कंट्रोल्स१६०. २७%
विष्णू केमिकल्स१५४, ६७ %
अरिहंत कॅपिटल मार्केट्स   १५० %
वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज१४३. ३९ %
जगसनपाल फार्मास्युटिकल्स१३४ . ५४ %
मोनार्क नेटवर्थ कॅपिटल१३३.२२ %
बेएल एस इंटरनॅशनल सर्व्हिसेस१३२.७६%
वाडीलाल इंडस्ट्रीज१३०. ६१ %
रेमंड१३०. २६ %

एकीकडे काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना उत्तम परताव्याच्या रूपाने दसऱ्याची भेट दिली असली तरी काही कंपन्यांनी त्याचे पैसे बुडवले, हीदेखील वस्तुस्थिती आहे.  

उदाहरणार्थ, फ्युचर रिटेलचा शेअर गेल्या एका वर्षात ९३ % ने खाली आला आहे तर  फ्युचर कन्झ्युमर  सुमारे ७६ % खाली आहे. इतर सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्यांमध्ये गायत्री प्रोजेक्ट्स, फ्युचर लाइफस्टाइल फॅशन आदींचा समावेश आहे.