मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Budget 2023 : बजेटपूर्वी हे पाच स्टाॅक्स देतील छप्परफाड रिटर्न्स, पहा लिस्ट

Budget 2023 : बजेटपूर्वी हे पाच स्टाॅक्स देतील छप्परफाड रिटर्न्स, पहा लिस्ट

Jan 18, 2023, 02:59 PM IST

    • Budget 2023 : पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांपूर्वी वर्षभरात पायाभूत सुविधांवर आणि ग्रामीण भागासाठी तरतूद वाढवणे अपेक्षित आहे. त्यामुळे बजेटच्या घोषणेपूर्वी या दोन क्षेत्राशी निगडित या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येऊ शकते.
Multibagger stocks_HT

Budget 2023 : पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांपूर्वी वर्षभरात पायाभूत सुविधांवर आणि ग्रामीण भागासाठी तरतूद वाढवणे अपेक्षित आहे. त्यामुळे बजेटच्या घोषणेपूर्वी या दोन क्षेत्राशी निगडित या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येऊ शकते.

    • Budget 2023 : पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांपूर्वी वर्षभरात पायाभूत सुविधांवर आणि ग्रामीण भागासाठी तरतूद वाढवणे अपेक्षित आहे. त्यामुळे बजेटच्या घोषणेपूर्वी या दोन क्षेत्राशी निगडित या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येऊ शकते.

Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला जाहीर होत आहे. त्यात सरकार आर्थिक वृद्धी दरात वाढ होण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची शक्यता आहे, कोरोनानंतर अर्थव्यवस्थेत चांगली रिकव्हरी दिसत आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणूका होत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूकांकडे लक्ष देताना सरकार अर्थसंकल्पात खर्चात वाढ कऱण्यावर भर देऊ शकते. त्यासह ग्रामीण बाजारपेठेलील ग्राहकसंवेदनशीलता वाढवण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात तरतूद होऊ शकते.

ट्रेंडिंग न्यूज

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

China Gold Purchase : सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

भौगोलिक परिस्थिती पाहता, डिफेन्स क्षेत्रावर सरकारचे अधिक लक्ष राहणार आहे. त्यामुळे याक्षेत्रातील उत्पादनांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आव्हान आहे. यामुळे इतर देशांवरील आयातीवरील निर्बंध कमी होतील. सरकार उत्पादनातील वाढ करण्यावरही भर देणार आहेत. त्यामुळे काही क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समधील गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरु शकते.

एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग

यूनियन बटेटमध्ये पायाभूत क्षेत्रासाठी भरीव तरतूद होण्याची शक्यता आहे. याचा मोठा हिस्सा महामार्ग बांधकामांच्या खर्चावर अधिक तरतूद होण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंगला मिळाला. कंपनीने वपाणी आणि रेल्वेसारख्या एन्ट्री केली आहे. गेल्या काही वर्षांपासून रेल्वेच्या पायाभूत क्षेत्रावर सरकारचा फोकस अधिक राहणार आहे.

ईरकाँन

रेल्वेशी निगडित ज्या कंपन्या आहेत, त्यांना अर्थसंकल्पात अधिक फायदा होणार आहे. यात ईरकाॅन कंपनीलाही फायदा होऊ शकतो. कंपनीजवळ आधीच अंदाजे ४० हजार कोटी रुपयांचे आॅर्डर्स आहेत. या कंपनीचा वार्षिक महसूल ९ टक्के आहे.

लार्सन अँड ट्रयूब्रो

या कंपनीच्या महसूलात कोअर इंजिनिअरिंग आणि कंन्स्ट्रक्शन बिझनेसचा मोठा हिस्सा आहे. पीएलआय स्कीमचा फायदा एल अँड टीला मिळणार आहे. एल अँड टीजवळ मोठे आणि जटील प्रोजेक्ट्सला पूर्ण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या आँर्डर बूकमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

पॅरादीप फाॅस्पेट (पीपीएल)

सरकार फर्टीलायझर्सच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न आहे. त्याचा थेट फायदा पीपीएलला मिळणार आहे. कंपनी पी अँड के आणि यूरियाची उत्पादन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा फायदा कंपन्यांच्या शेअर्सला होणार आहे.

हिरोमोटोकाॅर्प

ही टू व्हिलर्स क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. ग्रामीण भागात या कंपनीचा हिस्सा सर्वात मोठा आहे. सरकारनेही अर्थसंकल्पात ग्रामीण बाजापेठेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचा फायदा हिरो मोटोकाॅर्पला होणार आहे. सेमीकंडक्टर चीपचा पुरवठा वाढत आहे. कच्च्या मालाच्या किंमतीतही घट झाली आहे. त्यामुळे कंपनीला आपले मार्जिन वाढवण्यास मदत मिळणार आहे.

विभाग