मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Audi connect : आता घरबसल्या मिळेल चार्जिंग पाॅईंट्सची माहिती, आॅडी कंपनीने लाॅन्च केले हे अॅप

Audi connect : आता घरबसल्या मिळेल चार्जिंग पाॅईंट्सची माहिती, आॅडी कंपनीने लाॅन्च केले हे अॅप

May 18, 2023, 05:04 PM IST

    • Audi connect : लक्झरी कार निर्माता ऑडीने आपल्या ई-ट्रॉन श्रेणीतील ग्राहकांसाठी देशभरातील चार्जिंग स्टेशनपर्यंत पोहोचण्यात मदत करण्यासाठी एक अॅप सादर केले आहे.
audi e tron HT

Audi connect : लक्झरी कार निर्माता ऑडीने आपल्या ई-ट्रॉन श्रेणीतील ग्राहकांसाठी देशभरातील चार्जिंग स्टेशनपर्यंत पोहोचण्यात मदत करण्यासाठी एक अॅप सादर केले आहे.

    • Audi connect : लक्झरी कार निर्माता ऑडीने आपल्या ई-ट्रॉन श्रेणीतील ग्राहकांसाठी देशभरातील चार्जिंग स्टेशनपर्यंत पोहोचण्यात मदत करण्यासाठी एक अॅप सादर केले आहे.

Audi connect : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज ‘मायऑडीकनेक्ट’ अॅपवर ‘चार्ज माय ऑडी’च्या लाँचची घोषणा केली. हे विशेषत: ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांसाठी अॅपवरील विविध चार्जिंग स्टेशन्ससाठी एक-थांबा अॅप्लीकेशन आहे. चार्ज माय ऑडी हा इंडस्ट्री-फर्स्ट उपक्रम आहे, जो इलेक्ट्रिक वाहन मालकांच्या सोयीसुविधेवर लक्ष केंद्रित करतो.

ट्रेंडिंग न्यूज

Export duty on onion : कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४० टक्के निर्यात शुल्क लागू

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

सध्या अॅप्लीकेशनमध्ये पाच चार्जिंग सहयोगींचा समावेश आहे: आर्गो ईव्ही स्मार्ट, चार्ज झोन, रिलक्स इलेक्ट्रिक, लायनचार्ज आणि झिऑन चार्जिंग, जे न्यूमोसिटी टेक्नॉलॉजीज ईएमएसपी रोमिंग सोल्यूशनद्वारे समर्थित आहेत.

७५० हून अधिक चार्जिंच पाॅईंट्सची माहिती उपलब्ध

चार्ज माय ऑडी ग्राहकांना कार्यक्षमपणे त्यांच्या ड्राइव्ह मार्गाचे नियेाजन करण्याची, मार्गातील चार्जिंग स्टेशन्सची माहिती मिळवण्याची, चार्जिंग टर्मिनल्सची उपलब्धता तपासण्याची, चार्जिंग सुरू करण्याची व थांबवण्याची, तसेच सिंगल पेमेंट गेटवेच्या माध्यमातून सेवेसाठी देय भरण्याची सुविधा देते. सध्या ‘चार्जमाय ऑडी’वर ऑडी ई-ट्रॉन मालकांसाठी ७५० हून अधिक चार्ज पॉइण्‍ट्स उपलब्ध आहे आणि पुढील काही आठवड्यांमध्ये व महिन्‍यांमध्ये अधिक चार्ज पॉइण्ट्सची भर करण्यात येणार आहे.

अॅपचे वैशिष्ट्य

चार्ज माय ऑडी विविध अॅप्लीकेशन्स डाऊनलोड करण्याचा त्रास दूर करते. ऑडी ई-ट्रॉन ग्राहक ‘मायऑडीकनेक्टअॅप’चा वापर करत चार्जिंग प्रक्रिया सुरू करू शकतात, तसेच त्याचवेळी ऑटोमेटेड आयडेण्टिफिकेशन व बिलिंग प्रक्रिया सुरू होईल.

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, ‘‘ ‘चार्जमायऑडी’ अद्वितीय, इंडस्ट्री-फर्स्ट उपक्रम आहे, ज्याचा ग्राहकांना सोयीसुविधा देण्याचा इरादा आहे. आम्ही भारतात ई-ट्रॉन लाँच केल्यापासून इलेक्ट्रिक गतीशीलतेप्रती परिवर्तनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वसमावेशक इकोसिस्टम निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.’’

विभाग