मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Audi Q 3 Sportback : फक्त ७.३ सेकंदांमध्ये १०० किमी/तास, स्पोर्टी लूक, ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक दाखल

Audi Q 3 Sportback : फक्त ७.३ सेकंदांमध्ये १०० किमी/तास, स्पोर्टी लूक, ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक दाखल

Mar 14, 2023, 05:38 PM IST

    • Audi Q 3 Sportback : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक लाँच केली. जाणून घ्या या गाडीचे फिचर्स, स्पेसिफिकेशन्स इत्यादी.
Audi Q 3 Sportback HT

Audi Q 3 Sportback : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक लाँच केली. जाणून घ्या या गाडीचे फिचर्स, स्पेसिफिकेशन्स इत्यादी.

    • Audi Q 3 Sportback : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक लाँच केली. जाणून घ्या या गाडीचे फिचर्स, स्पेसिफिकेशन्स इत्यादी.

Audi Q 3 Sportback : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक लाँच केली. ऑडी क्यू३ स्पोर्टबॅकमध्ये दैनंदिन कारची शक्तिशाली उपस्थिती व वैविध्यतेसह स्पोर्टी आकर्षकता व कूपेची गतीशील हाताळणी आहे. ही वैशिष्ट्ये या कारला भारतातील ऑडी ब्रॅण्डची पहिली कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर बनवतात.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

इंजिन क्षमता

क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह आणि २.० लीटर टीएफएसआय पेट्रोल इंजिनच्या शक्तीसह सुसज्ज नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक १९० एचपी शक्ती आणि ३२० एनएम टॉर्कची निर्मिती करते. ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक तिच्या विभागातील सर्वात गतीशील कार आहे आणि फक्त ७.३ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करते.

स्पोर्टी लूक

नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक एस-लाइन एक्स्टीरिअर पॅकेजसह स्पोर्टीयर व शार्पर आहे, तसेच तिची कूपे-सारखी डिझाइन व स्टायलिश नवीन अलॉई व्हील्स असलेली विभागातील पहिलीच कार आहे. की शिवाय प्रवेशासाठी कम्फर्ट की आणि सानुकूल एैसपैस जागा अशी वैशिष्ट्ये आकर्षक लुकसह युटिलिटी व आरामदायीपणाचा शोध घेत असलेल्या ग्राहकांसाठी या कारला पसंतीची बनवतात.

Audi Q 3 Sportback HT

रंगसंगती आणि किंमत

नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक टर्बो ब्ल्यू, ग्लेशियर व्हाइट, क्रोनोस ग्रे, मिथोस ब्लॅक आणि नवेरा ब्ल्यू या पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. ही कार ओकापी ब्राऊन आणि पर्ल बिज हे दोन इंटीरिअर रंग पर्याय देखील देते. नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक ५१,४३,००० रूपये एक्स-शोरूम या किंमतीत उपलब्ध आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, ‘‘ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक या कारमध्ये आकर्षक डिझाइन व स्पोर्टी कार्यक्षमता आहे. ही कार संभाव्य ऑडी क्यू३ ग्राहकांना निवड करण्याचा पर्याय देते. ऑडी क्यू३ विभागामध्ये अग्रणी आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक ग्राहकांमधील तिच्या लोकप्रियतेची पुनरावृत्ती करेल. आम्ही गेल्या वर्षी लाँच केलेल्या ऑडी क्यू३ ला मिळालेल्या उत्स्फूर्त यशामधून आम्हाला नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक लाँच करण्यास प्रेरणा मिळाली आहे. आम्हाला देशामध्ये ही कार अत्यंत यशस्वी ठरण्याचा विश्वास आहे.’’

Audi Q 3 Sportback HT

सुसज्ज ड्रायव्हिंग क्षमता

नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅकमध्ये क्वॉट्रो ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम आहे, जी रस्त्यांच्या सर्व स्थितींमध्ये ट्रॅक्शन, गतीशीलता, स्थिरता व डायनॅमिक हाताळणीसंदर्भात उत्तम सुविधा देते. तसेच नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅकची ड्रायव्हिंग क्षमता वाढवण्यासाठी व समायोजित करण्यासाठी ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट ड्रायव्हरला विविध ड्रायव्हिंग मोड्समधून निवड करण्याची सुविधा देते.

वैशिष्ट्ये:

- २५.६५ सेमी (१०.१ इंच) एमएमआय नेव्हिगेशन प्लससह एमएमआय टच

- ऑडी व्हर्च्युअल कॉकपीट प्लस

- ऑडी साऊंड सिस्टम (१० स्पीकर्स, ६ चॅनेल अॅम्प्लिफायर, १८० वॅट)

- ऑडी फोन बॉक्ससह वायरलेस चार्जिंग सिस्टम

- ऑडी स्मार्टफोन इंटरफेस

- २-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम

- पार्किंग एड प्लससह रिअर व्ह्यू कॅमेरा

- कम्फर्ट की सह गेस्चर कंट्रोल्ड टेलगेट

- इलेक्ट्रिकली चालू-बंद होणारे लगेज कम्पार्टमेंट लिड

- एक्स्टीरिअर मिरर्स, पॉवर-अॅडजस्टेबल, हिटेड व पॉवर फोल्डिंग, दोन्ही बाजूंनी ऑटो-डिमिंग

- ६ एअरबॅग्ज

- टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम

विभाग

पुढील बातम्या