मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Audio : जमीन असूनही पोरगी मिळेना, लग्नासाठी तरुणाची आमदाराला साद; ऑडिओ क्लीप व्हायरल

Viral Audio : जमीन असूनही पोरगी मिळेना, लग्नासाठी तरुणाची आमदाराला साद; ऑडिओ क्लीप व्हायरल

Jan 10, 2023, 08:48 AM IST

    • Kannad Viral Audio : लग्नासाठी पोरगी मिळत नसल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वीच सोलापुरात अविवाहित तरुणांची मोर्चा काढला होता. त्यानंतर पोरगी मिळावी म्हणून तरुणानं थेट आमदाराला गळ घातली आहे.
Kannad Aurangabad Viral Audio (HT)

Kannad Viral Audio : लग्नासाठी पोरगी मिळत नसल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वीच सोलापुरात अविवाहित तरुणांची मोर्चा काढला होता. त्यानंतर पोरगी मिळावी म्हणून तरुणानं थेट आमदाराला गळ घातली आहे.

    • Kannad Viral Audio : लग्नासाठी पोरगी मिळत नसल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वीच सोलापुरात अविवाहित तरुणांची मोर्चा काढला होता. त्यानंतर पोरगी मिळावी म्हणून तरुणानं थेट आमदाराला गळ घातली आहे.

Kannad Aurangabad Viral Audio : लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यामुळं काही दिवसांपूर्वीच सोलापुरातील अविवाहित तरुणांनी भव्य मोर्चा काढला होता. त्यावर राज्यासह देशभरात चर्चा होत असतानाच आता औरंगाबादेतील एका तरुणानं लग्नासाठी पोरगी मिळावी म्हणून थेट शिवसेनेच्या आमदाराला गळ घातली आहे. घरी शेतीवाडी असूनही पोरगी मिळत नसून या प्रकरणात तुम्ही लक्ष घालून मदत करावी, अशी मागणी अविवाहित तरुणानं आमदाराकडे केली आहे. अविवाहित तरुण आणि आमदाराच्या संवादाची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामुळं आता यावरून चांगलीच चर्चा रंगली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Boat sank in Bhima : वादळामुळे भीमा नदीत उजनी धरणात बोट उलटली; ६ जण बुडाले, एकाने पोहून वाचवले प्राण

Nashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, ३ तरुणींचा समावेश

Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले...

Gondia Accident : दारूच्या नशेनं घेतला आणखी एक बळी, गोंदियात कपडे धूत असलेल्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला आठ ते नऊ एकर शेती असतानाही लग्नासाठी पोरगी मिळत नव्हती. त्यामुळं हताश झालेल्या तरुणानं लग्नासाठी पोरगी शोधून देण्यासाठी थेट कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांना फोन केला. त्यात त्यानं घरी भरपूर शेती असूनही कुणी पोरगी द्यायला तयार नाही, तुमच्या कन्नड सर्कलमध्ये भरपूर मुली आहेत, असं म्हणत लग्नासाठी मुलगी शोधून देण्याची मागणी केली. त्यानंतर आमदार राजपूत यांनीही तरुणाला तात्काळ बायोडाटा पाठवून देण्यास सांगितले. त्यानंतर आता आमदार उदयसिंह राजपूत यांनी तरुणाला सोयरीक जमवण्यासाठी मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं.

अविवाहित तरुण आणि आमदार उदयसिंह राजपूत यांच्या संवादाची क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी मिश्किल प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी लग्नासाठी पोरगी न मिळणं हा प्रश्न राज्यात गंभीर होत चालल्याचं म्हटलं आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. दोन आठवड्यांपूर्वी अविवाहित तरुणांनी लग्नासाठी सोलापुरात भव्य मोर्चा काढला होता. त्यानंतर आता अविवाहित तरुणानं लग्नासाठी थेट शिवसेनेच्या आमदाराला गळ घातल्याची घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

पुढील बातम्या