मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Feng Shui Tips : घरातली नकारात्मकता करा दूर, पाहा काय सांगतं फेंगशुई

Feng Shui Tips : घरातली नकारात्मकता करा दूर, पाहा काय सांगतं फेंगशुई

May 12, 2023, 03:12 PM IST

  • Useful Feng Shui Tips : फेंगशुई शास्त्रात आपलं घर कसं असावं आणि त्याला सकारात्मक उर्जेनं कसं भरून टाकावं याबाबत विस्तृत माहिती दिली गेली आहे. आपण मात्र याच फेंगशुईच्या नियमांकडे पद्धतशीर दुर्लक्ष करतो. मग वास्तु नकारात्मक उर्जा घरात पसरवते.

घरात सकारात्मक उर्जा पसरवण्यासाठी काय करावं (Freepik)

Useful Feng Shui Tips : फेंगशुई शास्त्रात आपलं घर कसं असावं आणि त्याला सकारात्मक उर्जेनं कसं भरून टाकावं याबाबत विस्तृत माहिती दिली गेली आहे. आपण मात्र याच फेंगशुईच्या नियमांकडे पद्धतशीर दुर्लक्ष करतो. मग वास्तु नकारात्मक उर्जा घरात पसरवते.

  • Useful Feng Shui Tips : फेंगशुई शास्त्रात आपलं घर कसं असावं आणि त्याला सकारात्मक उर्जेनं कसं भरून टाकावं याबाबत विस्तृत माहिती दिली गेली आहे. आपण मात्र याच फेंगशुईच्या नियमांकडे पद्धतशीर दुर्लक्ष करतो. मग वास्तु नकारात्मक उर्जा घरात पसरवते.

फेंगशुई शास्त्रात आपलं घर कसं असावं आणि त्याला सकारात्मक उर्जेनं कसं भरून टाकावं याबाबत विस्तृत माहिती दिली गेली आहे. आपण मात्र याच फेंगशुईच्या नियमांकडे पद्धतशीर दुर्लक्ष करतो. मग वास्तु नकारात्मक उर्जा घरात पसरवते. मग याच नकारात्मक उर्जेने आपली कामं होत नाहीत. घरात चिडचिडेपणा वाढतो. फेंगशुई हे चिनी शास्त्र असलं तरीही त्याला मानणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त आहे. फेंगशुई प्रभावीही आहे. आज जाणून घेऊया फेंगशुईचे नियम ज्यानं घरात येईल प्रसन्नता.

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : चैत्र अमावस्येचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 08, 2024 04:00 AM

Mars Transit : मंगळाचे १ वर्षानंतर संक्रमण, मेष राशीत प्रवेश करून या ३ राशींसाठी ठरेल धन-समृद्धीकारक

May 07, 2024 03:28 PM

Rashi Bhavishya Today : चतुष्पाद करणात कसा जाईल आजचा मंगळवारचा दिवस! वाचा राशीभविष्य

May 07, 2024 04:00 AM

Gajkesari rajyog: गजकेसरी राजयोगात उजळणार ‘या’ ३ राशींचे भाग्य! उत्पन्न आणि मान-सन्मान वाढणार

May 06, 2024 09:11 PM

Rashi Bhavishya Today : सोमवारचा शिवरात्रीचा आजचा दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 06, 2024 04:00 AM

Lucky Rashi: जन्मतःच पैशाला आकर्षित करणाऱ्या असतात ‘या’ राशीचे लोक! पाहा कोणत्या आहेत या राशी

May 05, 2024 12:35 PM

घरातलं फालतूचं सामान बाहेर काढा

घरात असं सामान आहे ज्याचा तुम्हाला काहीच उपयोग नाही, असं सामान घरातून बाहेर काढा असं फेंगशुई शास्त्र सांगतं. जास्त सामान घरातल्या सकारात्मकतेचा प्रवाह कमी करतो असं फेंगशुई सांगतं. जर तुमच्या घरात इतके सामान असेल ज्यामुळे तुमच्या चालण्याच्या मार्गात अडथळा येत असेल तर ते चुकीचे मानले जाते. जेव्हा असे होते तेव्हा तुमच्या घरातील सकारात्मक उर्जेच्या प्रवाहात अडथळा येतो आणि तणाव वाढतो.

चुकूनही अशा प्रकारे ठेवू नका सोफा

फेंगशुईमध्ये ड्रॉईंग रूमच्या संदर्भात असं सांगण्यात आलंं आहे की बाहेरून येणाऱ्या लोकांनी सोफ्याच्या मागचा भाग पाहू नये. सोफ्यासमोरचे टेबल गोल नसून चौकोनी असावे. फेंगशुईमध्ये सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात कोणताही अडथळा येऊ नये यावर भर दिला जातो.

असं ठेवा घराचं प्रवेशद्वार

फेंगशुईमध्ये घराच्या प्रवेशद्वाराला खूप महत्त्व दिलं गेलं आहे.फेंगशुईनुसार, घराचे प्रवेशद्वार अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित असावे. बाहेरून येताना, घरात प्रवेश करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. कुलूप उघडण्यास आणि बंद करण्यास कोणतीही अडचण नसावी असंही फेंगशुईत सांगण्यात आलं आहे.

घरात ठेवा या वनस्पती

वास्तू आणि फेंगशुईमध्ये, भाग्यवान वनस्पती चांगले नशीब आणतात असे म्हटले गेलं आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये काही इनडोअर रोपे देखील लावू शकता. ही रोपं तुमच्या घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवतात. गोलाकार पाने असलेली झाडे लावणे चांगले मानले जाते. ते ऑक्सिजनची पातळी देखील राखतात.

फर्निचर ठेवण्याची योग्य पद्धत

लक्षात ठेवा की ऑफिस आणि घरात दोन्ही ठिकाणी, जिथे तुमची बसण्याची जागा आहे किंवा झोपण्याची जागा आहे, तेथून खोलीच्या दरवाजापर्यंत तुमचे डोळे सरळ दिशेतच असले पाहिजेत. खोलीच्या दारापर्यंत कोणताही अडथळा नसावा. दारातूनच सकारात्मक ऊर्जा वाहते असे मानले जाते. अशा वेळी अडथळ्यांमुळे तुमच्या आयुष्यातही अडथळे निर्माण होतात असं फेंगशुई सांगतं.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग