मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Vastu Tips : तुमच्या घरात वास्तुदोष आहेत का?, मग करा हे उपाय

Vastu Tips : तुमच्या घरात वास्तुदोष आहेत का?, मग करा हे उपाय

Apr 17, 2023, 12:02 PM IST

  • Vastu Tips For Home : वास्तुशास्त्र आपल्याला घरातल्या गोष्टींबाबत उपाय सांगत असतं. ते सोपे उपाय केल्यास गृहक्लेश नाहीसा होतो आणि आपल्याला भरभराटीचं जीवन अनुभवायला मिळतं.

घरातले कलह कसे दूर कराल (हिंदुस्तान टाइम्स)

Vastu Tips For Home : वास्तुशास्त्र आपल्याला घरातल्या गोष्टींबाबत उपाय सांगत असतं. ते सोपे उपाय केल्यास गृहक्लेश नाहीसा होतो आणि आपल्याला भरभराटीचं जीवन अनुभवायला मिळतं.

  • Vastu Tips For Home : वास्तुशास्त्र आपल्याला घरातल्या गोष्टींबाबत उपाय सांगत असतं. ते सोपे उपाय केल्यास गृहक्लेश नाहीसा होतो आणि आपल्याला भरभराटीचं जीवन अनुभवायला मिळतं.

आपली वास्तू नीट असेल तर त्या वास्तूत राहाणाऱ्या व्यक्तींचं आयुष्य सुखी होतं. वास्तूमध्ये दोष असेल तर मात्र ते दोष दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय करावे लागतात. वास्तुशास्त्र आपल्याला घरातल्या गोष्टींबाबत उपाय सांगत असतं. ते सोपे उपाय केल्यास गृहक्लेश नाहीसा होतो आणि आपल्याला भरभराटीचं जीवन अनुभवायला मिळतं. मग असे वास्तुचे कोणते नियम आहेत जे पाळल्याने आपल्या जीवनात भरभराट येऊ शकते ते पाहूया.

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : प्रदोष व्रताचा आजचा दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 05, 2024 04:00 AM

Guru Shukra Yuti : वृषभ राशीत होणार गुरू-शुक्र युती, आता या ५ राशींची पूर्ण होणार सर्व स्वप्ने

May 04, 2024 03:45 PM

Panchak 2024: सुरू आहे पंचक काळ! चुकूनही 'या' वेळेत करू नका शुभ कामं! जाणून घ्या अशुभ वेळ

May 04, 2024 01:50 PM

Rashi Bhavishya Today : वरुथिनी एकादशीचा आजचा दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 04, 2024 04:27 AM

Rashi Bhavishya Today : विषयोगात शुक्रवारचा आजचा दिवस किती महत्वाचा राहील! वाचा राशीभविष्य

May 03, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : गजकेसरी योगात आजचा दिवस कोणासाठी ठरेल खास! वाचा राशीभविष्य

May 02, 2024 04:00 AM

वास्तुदोष नाहीसे करण्यासाठी कोणते उपाय करावेत.

गळणारे नळ दुरूस्त करावेत.

वास्तूनुसार दररोज घरातील पाणी वाया गेल्याने तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत तुमच्या घराच्या टाकी, नळ किंवा पाईपमधून नेहमी पाणी गळत असेल तर त्याला नीट करणे उत्तम. पाणी गळती होत असल्यास लक्ष्मी माता तिथे राहात नाही.

घरात सुकलेलं झाड ठेवू नये.

जर तुम्ही तुमच्या घरात एखादे झाड लावले असेल आणि त्यात फुले उमलली असतील तर लक्षात ठेवा की फुले कोमेजल्यानंतर ती फुलं काढून टाका. कारण सुकलेली फुले आणि झाडे सुख-समृद्धीवर परिणाम करतात.

देवघरातुन शिळी फुलं काढावीत.

देवघरात देवाला फुलं वाहिल्यास संध्याकाळी ती फुलं किंवा ते निर्माल्य काढून टाकावं. यासोबतच तुटलेली किंवा बंद पडलेली घड्याळे घरात ठेवू नयेत, ती दुरुस्त करावीत किंवा घराबाहेर फेकून द्यावीत कारण अशी घड्याळे प्रगतीत अडथळे निर्माण करतात.

पलंगाखालीही झाडून घ्यावं

घरात अनेकदा कचरा काढताना मोठ्या पलंगाकडे दर्लक्ष होतं. अशा स्थितीत पलंगाखालून झाडू काढावी म्हणजे कचरा काढावा. असं केल्याने घरात प्रसन्नता येते आणि रात्री झोपही उत्तम लागते. याशिवाय पलंगाखाली असलेली नकारात्मकता दूर होते.

पलंगाखाली चपला किंवा केरसुणी ठेवू नये 

वास्तूनुसार झाडू, शूज, चप्पल इत्यादी पलंगाखाली चुकूनही ठेवू नये, असे केल्याने धनहानी होते. 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग