मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Monthly Horoscope April 2023 : एप्रिल महिन्यात 'या' राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार!

Monthly Horoscope April 2023 : एप्रिल महिन्यात 'या' राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार!

HT Marathi Desk HT Marathi

Apr 01, 2023, 09:00 PM IST

  • Rashi Bhavishya April 2023 : लक्ष्मीदायक शुक्र, समृद्धीदायक रवि आणि ज्ञान वृद्धीकारक गुरू या ग्रहांच्या राशीबदलात घडतील शुभाअशुभ परिणाम! पाहा मासिक राशीभविष्य !

Horoscope Monthly

Rashi Bhavishya April 2023 : लक्ष्मीदायक शुक्र, समृद्धीदायक रवि आणि ज्ञान वृद्धीकारक गुरू या ग्रहांच्या राशीबदलात घडतील शुभाअशुभ परिणाम! पाहा मासिक राशीभविष्य !

  • Rashi Bhavishya April 2023 : लक्ष्मीदायक शुक्र, समृद्धीदायक रवि आणि ज्ञान वृद्धीकारक गुरू या ग्रहांच्या राशीबदलात घडतील शुभाअशुभ परिणाम! पाहा मासिक राशीभविष्य !

रिल मधील शुभाअशुभ दिवस

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : प्रदोष व्रताचा आजचा दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 05, 2024 04:00 AM

Guru Shukra Yuti : वृषभ राशीत होणार गुरू-शुक्र युती, आता या ५ राशींची पूर्ण होणार सर्व स्वप्ने

May 04, 2024 03:45 PM

Panchak 2024: सुरू आहे पंचक काळ! चुकूनही 'या' वेळेत करू नका शुभ कामं! जाणून घ्या अशुभ वेळ

May 04, 2024 01:50 PM

Rashi Bhavishya Today : वरुथिनी एकादशीचा आजचा दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 04, 2024 04:27 AM

Rashi Bhavishya Today : विषयोगात शुक्रवारचा आजचा दिवस किती महत्वाचा राहील! वाचा राशीभविष्य

May 03, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : गजकेसरी योगात आजचा दिवस कोणासाठी ठरेल खास! वाचा राशीभविष्य

May 02, 2024 04:00 AM

उत्तम दिवसः ०६,०७,१४,२३,२६,३०.

चांगला दिवसः२,४,१३,१६,२१,२५,२८,२९.

अनिष्ट दिवसः १०,११,१८,१९,२०.

मेषः महिन्याच्या सुरूवातीस काळ भाग्योदयाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी राहील. नवयुवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नवनवीन संधी आपल्याला मिळणार आहेत. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहे. पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. सरकारकडून आपल्या कामाची प्रशंसा सन्मानाने होईल. संततीकडून सर्वदृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. त्यांची प्रगती कामाचा उरक वाढविला पाहिजे. घरातील वरिष्ठांची काळजी आपणाला वाटेल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कोर्टकचेरीचे काम सहज पार पडतील त्यामध्ये आपणास विरोधकावर मात करता येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. व्यवसायिकांना आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळवून देईल. जमीन विक्रीतून लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. उत्तम मित्र मिळतील. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. आपल्या शांतताप्रिय व न्यायी स्वभावामुळे आपला लौकिक वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या विरुद्ध आपण जात नाही, त्यामुळे बढतीचे योग येतील. हाताखालच्या लोकांकडून आपण चांगले काम करून घ्याल. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागेल. शत्रूवर विजय मिळेल. आपल्या अनेक प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील. सामाजिक कार्यात मानसन्मान मिळेल. नोकरीत नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. चंद्रबलः ५,६,७,८,२२,२५,२६.

वृषभः महिन्यात रोजगारात व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल.आपणास मुशाफिरीत लाभ होईल. परदेशगमनाचे योग आहेत. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहिल. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. विद्यार्थ्यांना नवनविन क्षेत्रात यश संपादन होईल. कुटुंबात शुभवार्ता मिळेल.योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. विद्यार्थी एखादी परकीय भाषा शिकतील. कुंटुबावर व राहत्या घरावर फार प्रेम कराल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठया अधिकाराची नोकरी मिळेल. अध्यात्मिक उन्नती होईल. पितृ मातृ सुख उत्तम मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. उद्योगात लाभ होईल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. आपण सार्वजनिक चळवळीत आपला लौकीक सांभळण्याचा प्रयत्न करावा. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल. व्यसनापासून दूर रहा. व्यवसायिकांसाठी शुभप्रद फळे प्राप्त होतील. नोकरीत बदल करण्यास काळ अनुकूल आहे. राजकिय व्यक्तींना मोठा अधिकार प्राप्त होईल. मानसन्मान प्राप्त होईल. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. घरामध्ये समारंभाचे नियोजन कराल. अध्यात्मिक प्रगतीत वाढ होईल. चंद्रबलः १,७,९,१०,११,२७,२८,२९.

मिथुनः महिन्याच्या स्वभावावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. स्वभाव रागीट होईल. कुटुंबात कटकटी होतील. सुखाच्या अपेक्षेने विनाकारण श्रम करीत राहाल. आरोग्य नरम गरम राहील. स्वत:च्या नातेवाईकाकडुन अपमान होण्याची शक्यता आहे. तरूण तरूणीचे विवाहाचे योग आहेत. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. तिच्या आजारपणा मुळे दगदग वाढेल .आपल स्वभाव त्यागी चंचल असा राहील. संतती विषयी चिंता निर्माण होतील. डोळयाचे विकार होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांकडुन फसवणुक होईल. भागीदारासोबत वादविवाद टाळा. प्रवासात काळजी घ्या. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अपघात भय संभवते. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर नाराज होतील. भागिदार चांगले मिळतील. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे शत्रु निर्माण होतील. महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थितीत काहीसी सुधारणा होईल. व्यवसायिकांनी व्यवसायात बेताचीच गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. विद्यार्थ्यांना विद्याभ्यास उत्तम जमेल. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. भागिदारी व्यवसाय जपून करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. प्रेमप्रकरणात यश येईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल कराल. अनुकुल वातावरण असणार आहे. चंद्रबलः २,४,६,१०,१४,१६,२५,३०.

कर्कः महिन्यात सुरुवातीस तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. मित्रमैत्रिणीच्या नातेवाईकांच्या सहकार्याने नवीन योजनेवर कार्य कराल. व्यापारवर्गास अचानक धनलाभाची संधी मिळेल. भावडांशी छोट्याशा कारणाने गैरसमज होऊ देऊ नका. वडिलधाऱ्या मंडळीचा मान राखा. चांगल्या लोकांच्या सहवासात रहा. काही लोक तुम्हाला गोत्यात आणण्याचा प्रयत्न करतील. संधीचे सोने करा. रोजगारात नवीन संधी प्रस्ताव येतील. बढतीचे योग आहेत. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड राहील. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून समाधान होईल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. पोस्ट बँका सहकारी संस्था यात काम करण्याची संधी मिळेल. शत्रुपक्षावर मात कराल. वैद्यकीय व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. परदेशात भ्रमणाचे योग आहेत. आरोग्य उत्तम राहील. लॉटरीमध्ये फायदा होईल. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रवासात लाभ होईल. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना हा सप्ताह आर्थिकदृष्या लाभ देणारा आहे.पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. घरात आंनदी वातावरण राहील. चंद्रबलः १,५,११,१५,१७,२३,२५,२७.

सिंहः महिन्यात नोकरीत वरिष्ठांच्या सहकार्यामुळे बढती मिळेल. स्वतःला सिद्ध कराल. आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. तरुण तरुणीचे विवाहाचे योग आहेत. विद्याभ्यासात प्रगती कराल. कलाक्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. महिन्याच्या मध्यान्न काळात आपल्या कुवतीपेक्षा मोठी जबाबदारी स्विकारू नये. फसगत होण्याची शक्यता आहे. शत्रुत्व निर्माण होईल. व्यसनाधिनता यावर आवर घालावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. आरोग्या बाबतीत खर्चात वाढ होईल.उत्तरार्धात शुभ फलदायी घटना घडणार आहेत. शुभवार्ता ऐकायला मिळतील. वत्कृत्वकलेत वाढ होईल. धार्मिक अध्यात्मिक सोख्य लाभेल. सत्पुरुषांच्या सेवेतून सन्मार्गाने उत्तम धन मिळेल. सार्वजनिक कामात भाग घ्याल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. मित्र आणि नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. प्रवासातुन धनप्राप्ती होईल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. नोकरीत बदलीचे योग आहेत. चंद्रबलः ३,७,९,११,१४,१८,२५,२७,३०.

कन्याः महिन्यात घरातील वरिष्ठांची काळजी घेणे जरुरीचे आहे. बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी जरूर मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीदायक यश मिळणार आहे. आपण केलेले नियोजन सुरळीत पार पडेल. कोर्टकचेरीच्या कामांसाठी काळ अनुकूल आहे. आपण विवाहाच्या विचारात असाल खात्रीशीर उत्तम पार पडतील. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांमध्ये सहभाग घेतला तर यश मिळेल. नोकरवर्गाने वरिष्ठांशी संयमाने वागावे लागणार आहे. आपली बदली मनाविरुद्ध होण्याची संभावना आहे. सुशिक्षीत तरूण बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. व्यवसायिकांनी भागीदारी न करणे योग्य आहे. व्यवसायात आपणाला अपेक्षित फायदा न झाल्याने आपण चिंतीत असाल. भागिदारी व व्यवसायातले व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. कर्जामुळे आपणास त्रास जाणवेल. महिन्याच्या मध्यान्न काळानंतर अनुकूलता लाभणार आहे. त्यामुळे व्यवसायिक समाधानी असतील नातेवाईक मित्रमंडळी यांची साथ उत्तम मिळेल. व्यवसायिकांनी व्यवसायात गुंतवलेले भांडवल फायदेशीर ठरेल. नवीन घराची खरेदी करण्यास काळ अनुकूल आहे. प्रेमी युगुलांसाठी काळ अनुकूल आहे. सामाजिक कार्यात ज्यांचा सहभाग आहे. त्यांना बहुमान मिळण्याची संभावना आहे. व्यापारी वर्गाने आर्थिक गुंतवणूक केली तर त्यामध्ये फायदा निश्चित होईल. चंद्रबलः १,५,१०,११,२५,२६,२७,२८,२९.

तुलाः महिन्यात ग्रहयोग प्रगतिशील राहतील. खेळाडूंसाठी काळ यशदायक आहे. शेअर्समध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल. व्यवसायामध्ये आर्थिक आवक उत्तम प्रकारे आलेली अनुभवास येईल. प्रगतीचा आलेख उंचावलेला असेल. नोकरदारांसाठी ग्रहमान साथ देणार आहे. आपणास प्रिय असणारी नोकरीमध्ये बढतीची बातमी वरिष्ठ आपल्याला देणार आहे. लेखक वर्गास त्याच्या उत्कृष्ठ लेखन शैलीमुळे आर्थिक आवक उत्तम येईल. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग मिळतील. स्वत:च्या वास्तूमध्ये राहण्याचा आनंद आपण घ्याल. वास्तू खरेदी करुन घेतच आहात त्याच बरोबर वाहन खरेदी केल्यामुळे आपले घरातील व्यक्ती आपणावर प्रेमाचा वर्षाव तर नक्कीच करणार आहे. कलाकारांना प्रसिद्धीचा काळ उत्तम आहे. त्याच बरोबर कामामध्ये विलंब लागण्याची संभावना आहे. प्रवासातून आपणास योग्य दिशा मिळेल. आर्थिक बचत आपण उत्तम प्रकारे करु शकाल. आपल्या समस्येपेक्षा दुसऱ्याचे कष्ट कमी करण्यासाठी आपण नेहमी तत्पर रहाल. विवाह इच्छुकांचे विवाहयोग उत्तम आहे. आपण इच्छित असलेल्या कामात यश मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. प्रगतीचे नवे मार्ग आपणास ग्रहमान देणार आहे. लांबचे प्रवास आनंददायक होतील. नोकर वर्गावर विसंबून न रहाणे व्यवसायिकांना कमी त्रासाचे आहे. समाजासाठी आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याला बहुमाना बरोबर प्रसिद्धीही मिळेल. चंद्रबलः १,३,५,८,२३,२४,२७,२९.

वृश्चिकः महिन्यात व्यापारात भागीदारीमुळे आपल्या व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. आपण सतत कामात तर असताच व कोणतेही काम चिकाटीने पूर्णत्वास करण्याचा आपला स्वभाव आपल्याला या वेळी साथ देणार आहे. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. लेखकवर्गासाठी काळ अतिशय अनुकूल आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. नोकरदारांनी आपल्या ओळखीचा फायदा होईल. आपल्याला नवीन घर वाहन घेण्याचा योग दुग्धशर्करा आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला नशिबाची साथ उत्तम मिळवून देणारे ग्रहयोग आहेत. कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेन त्यामुळे आपण खुष असाल. एकंदरीत ग्रहस्थिती मानसिक स्वस्थ्य उत्तम देणारी आहे. आपल्या समोर नवीन व्यवसायाचे प्रस्ताव इतर व्यावसायिक मांडतील. संतती योग उत्तम आहे. आपल्या आयुष्यातील अनपेक्षीत शुभप्रद घटना घडतील. व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. नोकरदारांना वरिष्ठांकडून बक्षीस मिळेल. तुमच्या कामाचे गोडकौतुक केले जाईल. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. कोर्टकचेरीची कामे सुरळीत पार पाडणारा योग आहे. शेअर्स खरेदी तूर्तास लांबणीवर ठेवलेली योग्य राहील. मनासारख्या घटना घडण्यास पूरक काळ आहे. आर्थिक आवक उत्तम राहील. शासकीय कामाच्या दृष्टीने अनुकुलता लाभेल. कोर्टाचा निकाल आपल्या लागेल. कौटुंबिक सुख व शांतीचे वातावरण लाभेल. कोणावरही अंधविश्वास बाळगु नका. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. चंद्रबलः २,४,५,७,१०,११,१४,१९,२६,२८.

धनुः महिन्यात शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम कालावधी आहे. नोकरी व्यापार दोन्हीकरीता नवीन संधी मिळतील त्यातून निश्चित लाभ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मात्र आपल्या बोलण्यावर आणि संशयीवृत्तीवर नियंत्रण ठेवा. राजकीय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान लाभेल. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. वाहन-घर खरेदीसाठी शुभ योग आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आरोग्य उत्तम राहिल. मानसिक स्वास्थ लाभेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढीस लागेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून उत्तम कालखंड आहे.विरोधकावर मात कराल. संतती कडून चांगली बातमी मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. आर्थिक प्रगती राहणार आहे.कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य लागेल. चंद्रबलः २,४,५,७,१०,११,१४,१९,२६,२८.

मकरः महिन्यात नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाला उत्तम दाद मिळेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ लाभेल. सोबतच आपण केलेल्या कामाचे कौतूक होऊन मानसन्मान देखील लाभणार आहे. वाहन सौख्य मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल. व्यापारात व्यवसियाकांनी केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला सकारात्मक परिणाम दिसतील. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. स्पर्धापरिक्षेत आपण यशस्वी व्हाल. कला लेखकवर्गास लिखाणाच्या माध्यमातून उत्तम प्रसिद्धि योग आहेत. विरोधकावर मात करण्यास काळ उत्तम आहे. मित्रमैत्रिणींकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात आनंदी वार्ता मिळेल. मानसिक अवस्था उत्तम राहील. आपला आत्मविश्वास उंचावलेला असेल. कोणत्याही स्वरूपाच्या वादामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊ नका. अन्यथा स्वताःचे नुकसान करून घ्याल. अतिउत्साही व अविचारी घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात. आर्थिक आघाडीवर सप्ताह उत्तम राहणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. आपल्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लागेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकाकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहिल. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. स्वभावातील गुणदोषं मात्र टाळावेत. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. शासकिय योजनेतून लाभ होईल. चंद्रबलः १,७,९,११,२५,२७,२९.

कुंभ: महिन्यात सुरुवातीचे चंद्रभ्रमण आपणास व्यापार रोजगारात कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्थ्यासोबत तणाव वाढवू शकते .आपल्या कार्यक्षेत्रात परिस्थिती संयम ठेवून हाताळा. अन्यथा प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. नोकरीत स्थान बदल घडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गास प्रतिकुल काळ असणार आहे. काळजीपूर्वक व्यवहार करावेत. गुप्तशत्रु विरोधकांचा त्रास जाणवेल. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास अस्वस्थता जोडीदाराशी वादविवाद असे प्रसंग घडतील. कुटुंबात वडिलोपार्जित संपत्तीमध्ये नविन समस्या उद्‌भवतील.मध्यान्न काळानंतर ठरवलेल्या योजनांना गती मिळणार आहे. कामाचा व्याप वाढणार आहे आणि व्याप सांभाळण्याची तुमची क्षमताही वाढणार आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका. तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल. आखलेले योजना काही कालावधीत वेगाने मार्गी लागतील. कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही होणार आहेत. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. परंतु बोलण्यावर संयम ठेवा. स्पर्धकांवर मात कराल. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र मेहनत वाढवावी लागेल. आहारावर आणि व्यसनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अतिउत्साही आणि अतिरक पणा टाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. कर्जप्रकरणात विचाराअंती काळजीपूर्वक व्यवहार करा. चंद्रबलः १,२,३,४,१०,२७,२९,३०

मीनः महिन्यात व्यवसायात आर्थिक फसवणुकीची दाट शक्यता आहे. कायदेशीर प्रक्रिया कोर्ट कचेरीच्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. जमिन खरेदी विक्रीचे व्यवहार लांबणीवर टाका. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका विचारअंतीच निर्णय घ्यावेत. आपण बोलण्यावर संयम ठेवावा अन्यथा समस्या निर्माण होतील. लांबचे प्रवास जपुन करावेत. आरोग्याबाबतीत आर्थिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. संततीच्या आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीवर लक्ष द्यावे लागेल. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल काळ नाही. मित्रमैत्रिणी व इतर प्रलोभने यांच्यापासून दूर राहणे गरजेचे आहे. प्रतिकूल परिस्थिती सावधानतेने हाताळावी लागते. त्रासदायक काळात वादविवाद टाळा. नोकरीत अचानक बदल घडतील. वातावरण बदलणार आहे. पण बदल नजीकच्या पुढच्या काळासाठी फायदेशीर ठरणार आहेत. नोकरीत आपली मते दुसऱ्यांवर न लादता प्रेमाने वागून इतरांचे सहकार्य मिळवावे लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळल्याशिवाय अपेक्षित प्रगती करता येणार नाही. काळात मेहनत वाढवावी लागणार आहे. नातेवाईक यांच्याबरोबर तुमच्या वागण्या बोलण्यामुळे गैरसमज होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. नोकरीत आपली मते दुसऱ्यांवर न लादता प्रेमाने वागून इतरांचे सहकार्य मिळवावे लागेल. चंद्रबलः १,३,५,६,११,२३,२७,२९.

 

जय अर्जुन घोडके

jaynews21@gmail.com

(लेखक ज्योतिष विद्येचे अभ्यासक आहेत.)