मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Supriya Sule : मला पंतप्रधान मोदींची काळजी वाटते; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

Supriya Sule : मला पंतप्रधान मोदींची काळजी वाटते; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

Jan 19, 2023 03:15 PM IST Ganesh Pandurang Kadam
Jan 19, 2023 03:15 PM IST

Supriya Sule on PM Narendra Modi Mumbai Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्तानं मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. भाजपमध्ये एकेकाळी खूप मोठे नेते होते. आता या पक्षात नेतेच राहिलेले नाहीत. त्यामुळं ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत फक्त नरेंद्र मोदी यांनाच धावपळ करावी लागते. तेही बिचारे कष्ट करतात. त्यांच्याशिवाय भाजपला पर्याय नाही, त्याला ते तरी काय करणार? त्यामुळं मला त्यांची काळजी वाटते, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी भाजप नेत्यांना हाणला आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp