मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : पंतप्रधान आहात ना? मग रडता कसले? लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्या; खर्गेंनी मोदींना सुनावले!

Video : पंतप्रधान आहात ना? मग रडता कसले? लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्या; खर्गेंनी मोदींना सुनावले!

May 03, 2023 03:10 PM IST Ganesh Pandurang Kadam
May 03, 2023 03:10 PM IST

Mallikarjun Kharge on PM Modi : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातील रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेस व भाजपचे दिग्गज नेते प्रचारात उतरून एकमेकांवर तोफा डागत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे देखील ठिकठिकाणी सभा घेत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्राच्या कारभारावर निशाणा साधत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:च्या जातीचा मुद्दा काढून नको ते विषय प्रचारात आणत आहेत. लोकांना रडून दाखवत आहेत. त्यांना हे शोभत नाही. तुम्ही पंतप्रधान आहात. विरोधकांनी टीका केली म्हणून रडण्याऐवजी लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्या, असं खर्गे यांनी सुनावलं आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp