Uddhav Thackeray Speech in Boisar : पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी बोईसर इथं जाहीर सभा घेतली. ठाकरेंची शिवसेना नकली आहे, असं म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उद्धव ठाकरे यांनी यावेळी जोरदार समाचार घेतला. शिवसेनेला नकली म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का?,' असा बोचरा टोला उद्धव यांनी मोदींना हाणला. भाजप हा भाडखाऊ, भेकड जनता पक्ष आहे. जो देईल यांची साथ, त्यांचा करणार हे घात... ही यांची घोषणा आहे, अशी जळजळीत टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.