Aditya Thackeray Speech : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारसभेत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची खिल्ली उडवत आदित्य यांनी शिंदे गटावर घणाघाती हल्ला चढवला. माझ्यासोबत येणाऱ्या सर्वांना निवडून आणेन. नाही जमलं तर राजीनामा देईन, असं दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. आता त्यांच्या सोबतच्या पाच-सहा लोकांना उमेदवारीही मिळू शकलेली नाही. एका ताईंना आम्ही पाच वेळा खासदार बनवलं. आता तिकीटही नाही. ही यांची परिस्थिती आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी हाणला. भाजपच्या कारभारावरही त्यांनी जोरदार टीका केली.