Rajnikant Lal Salaam: सुपरस्टार रजनीकांत स्टारर ‘लाल सलाम’ हा चित्रपट आज रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या रिलीज आधीच चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. चेन्नईमधील रोहिणी फिल्म्स या थिएटरबाहेर चाहत्यांनी सकाळपासूनच जल्लोष सुरू केला आहे. या थिएटर बाहेर ‘लाल सलाम’च्या लूकमधील रजनीकांत यांचा मोठा कटआऊट लावण्यात आले आहे. त्यावर सुमारे १४ भले मोठे वजनदार फुलांचे हार घालण्यात आले आहेत.