Video : तेव्हा एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले होते; विजय शिवतारे यांच्या बंडाबद्दल बोलताना अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : तेव्हा एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले होते; विजय शिवतारे यांच्या बंडाबद्दल बोलताना अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

Video : तेव्हा एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले होते; विजय शिवतारे यांच्या बंडाबद्दल बोलताना अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

Apr 12, 2024 12:41 PM IST

Ajit Pawar speech in saswad : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सासवड इथं महायुतीचा शेतकरी जनसंवाद मेळावा झाला. अजित पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकत लोकसभेची तयारी करणारे व नंतर माघार घेणारे माजी मंत्री विजय शिवतारे हे देखील यावेळी उपस्थित होते. अजित पवार यांनी यावेळी शिवतारे यांची तोंडभरून स्तुती केली. शिवतारे यांनी ज्यावेळी एक वेगळी भूमिका घेतली, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले होते. आपल्या जिवाभावाचा सहकारी अशी भूमिका घेतो हे पाहून ते निराश झाले होते. शिवतारेंना हे कळल्यावर त्यांनी आपली भूमिका बदलली. मात्र पुरंदर आणि जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द आमच्याकडून घेतला, असं अजित पवार म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp