Latest marathi celebrity Photos

सोनी वाहिनीवरील ‘मॅडनेस मचाएंगे’ हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमात मराठी विनोदवीर कुशल बद्रिके, हेमांगी कवी आणि गौरव मोरे दिसत आहे. तिघेही आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरत आहेत. येत्या भागात कुशल बद्रिके असे काही सादर करणार आहे सर्वजण चकीत होणार आहेत.

मी नक्कल करताना घाबरलो होतो; ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये कुशल बद्रिके करणार चंकी पांडेची मिमिक्री

Thursday, May 16, 2024

भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब पद्धतीला सर्वात जास्त महत्त्व दिले जात आहे. कुटुंबाशिवाय कोणतीही व्यक्ती ही पूर्ण होत नाही. कुटुंब हे प्रत्येक व्यक्तीचं सर्वस्व असते. पूर्वीच्या काळातील एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत असला तरी बदललेली कुटुंब पद्धत आजही सगळीकडे आहे. या जागतिक कुटुंब दिनानिमित्त अभिनेत्री अमृता खानविलकरने फोटो शेअर केले आहेत.

आई बाबा सोबतचा लंडन प्रवास आणि बरंच काही… जागतिक कुटुंब दिनानिमित्त अमृताने शेअर केले फोटो

Wednesday, May 15, 2024

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाची विजेती कार्तिकी गायकवाड कायमच चर्चेत असते. या कार्यक्रमाने कार्तिकाला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले आहे. तिने सुमधूर आवाजाने श्रोत्यांची मने जिंकली आहेत. २०२० साली तिने रोनित पिसेशी लग्न केले. त्यानंतर आता लग्नाच्या तीन वर्षांनंतर कार्तिकी आई होणार असल्याचे समोर आले होते. आता कार्तिकच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.

कार्तिकी गायकवाडच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन, सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती

Tuesday, May 14, 2024

अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. मुंबई लोकल या चित्रपटात प्रथमेश आणि ज्ञानदाची जोडी दिसणार असून, या नव्या जोडीविषयी चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या टीमने सिद्धिविनायक चरणी दर्शन घेऊन या चित्रपटाची घोषणा केली.

Mumbai Local Movie: 'मुंबई लोकल' चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर सिद्धिविनायक चरणी!

Friday, May 10, 2024

‘अल्याड पल्याड’ या आगामी मराठी चित्रपटात मकरंद देशपांडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ते तंत्र-मंत्र यात पारंगत असलेल्या एका सिद्धयोगी साधूची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

‘अल्याड पल्याड’ सिनेमात अभिनेते मकरंद देशपांडे यांची वर्णी, साकारणार वेगळी भूमिका

Monday, May 6, 2024

सध्या महाराष्ट्राचे राजकारण आणि लोकसभेची निवडणूक हे अनेकांच्या अस्मितेची लढाई झाली आहे. शरद पवार हे स्वत: यावेळी निवडणुकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. नुकताच शरद पवार यांची बारामतीमध्ये सांगता सभा पार पडली. पण त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली. हे कळताच मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने एक पोस्ट शेअर केली आहे.

'कृपया स्वत:ची काळजी घ्या साहेब', शरद पवारांची प्रकृती बिघडताच हेमंत ढोमेची पोस्ट

Monday, May 6, 2024

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये एक रंजक वळण आले आहे आणि ते घेऊन आली आहे सरगम. अधिपतीला भुवनेश्वरी कडून गाणं शिकायची परवानगी मिळते.

अधिपती- अक्षराच्या नात्यात नवे वादळ, 'तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये भुवनेश्वरी आखणार नवा डाव

Friday, May 3, 2024

मराठी चित्रपटसृ्ष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक म्हणून अभिनेता प्रसाद ओक ओळखला जातो. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. सध्या तो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मालिकेत तो सध्या परीक्षक म्हणून दिसत आहेत.

'तिकडे वडिलांना अग्नी देत होते आणि मी हास्यजत्रेच्या खूर्चीत', प्रसाद ओकने सांगितला धक्कादायक अनुभव

Thursday, May 2, 2024

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत हिने फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या सिद्धेश चव्हाणबरोबर तिने सात फेरे घेतले. इतकंच नाही तर, अभिनेत्री लग्नानंतर नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. सध्या अभिनेत्री पूजा सावंत ऑस्ट्रेलियामध्येच असून, ती भटकंती करताना दिसत आहे. आता अभिनेत्री मराठमोळ्या अंदाजात ऑस्ट्रेलियामध्ये ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला आहे.

Pooja Sawant: पूजा सावंतने खास अंदाजात ऑस्ट्रेलियामध्ये साजरा केला ‘महाराष्ट्र दिन’! पाहा फोटो...

Wednesday, May 1, 2024

मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी ही कायमच चर्चेत असते. बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाणारी हेमांगी ही सध्या हिंदी टेलिव्हिजनवर धमाल करताना दिसते. तिची एक हिंदी मालिका आणि एक कॉमेडी शो सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. दरम्यान, हेमांगीने ट्रोल करणाऱ्याला चांगलेच सुनावले आहे.

Hemangi kavi: 'विकृत चाळे' म्हणून ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्री हेमांगी कवीचे सडेतोड उत्तर

Wednesday, May 1, 2024

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' ही झी मराठी वाहिनीवरील मालिका सर्वांच्या आजही लक्षात आहे. या मालिकेतून अभिनेता अभिजीत खांडकेकर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. पण या त्याच्या या पहिल्या मालिकेच्या वेळी वाईट अनुभव आला आहे.

'याचा अर्थ आम्ही कोणाचे गुलाम आहोत असा नाही', अभिनेता अभिजीत खांडकेकर याने सांगितला अनुभव

Tuesday, April 30, 2024

मराठी चित्रपटसृष्टीमधील काही चित्रपट असे आहेत जे प्रदर्शित होऊन काही वर्षे उलटली आहेत. मात्र आजही प्रेक्षक ते चित्रपटात तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने पाहातात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'सैराट.' २०१६ साली प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटातील आर्ची आणि परश्याच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. पण तुम्हाला माहिती आहे का आर्ची या भूमिकेसाठी वेगळ्या अभिनेत्रीची निवड झाली होती.

'सैराट' चित्रपटात आर्चीच्या भूमिकेसाठी रिंकू राजगुरु नाही तर 'या' अभिनेत्रीची झाली होती निवड

Monday, April 29, 2024

अर्जुन एका गुन्हेगाराच्या शोधात उत्तराखंडला येतो. अमोलचा रिझल्ट असल्याने तो देवाला रिझल्टसाठी नाही तर अप्पीला त्याच्या शाळेतील करामती कळू नये म्हणून प्रार्थना करतोय, मंदिरात घंटा वाजवण्यासाठी त्याचा हात पोचत नाहीये त्याचवेळेस अर्जुन तिकडे येऊन आपल्या खांद्यावर घेऊन अमोलला घंटा वाजवायला मदत करतो.

अप्पीने दिलेलं वचन निभावलं, पण छोट्या पावलांनी शेवटी बाबांना शोधलं! मालिकेत नवे वळण

Monday, April 29, 2024

चित्रपटांबरोबरच सध्या कलाकार मंडळी गाण्यांच्या माध्यमातून स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकताना दिसत आहेत. सध्या सर्वत्र गाण्यांचा ट्रेंड सुरु असलेला पाहायला मिळत आहे. अनेक दर्जेदार गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येत असताना अशातच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित 'जय शंभूराया' आरती ही या ट्रेंडिंग गाण्यांमध्ये आलेली पाहायला मिळत आहे.

मराठमोळ्या अभिनेत्रीची छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना; पारंपरिक अंदाज ठरला लक्षवेधी!

Monday, April 22, 2024

मनोरंजन विश्वात सध्या लग्नसराईचा मौसम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी लग्न बंधनात अडकले आहे. अशातच आता मराठी मनोरंजन विश्वातील आणखी एक अभिनेता विवाह बंधनात अडकला आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका ‘शशांक’ म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरे याचा लग्न सोहळा नुकताच पार पडला आहे. या सोहळ्याचे काही फोटो आता चेतन त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम ‘शशांक’ अडकला लग्नबंधनात! चेतन वडनेरेने शेअर केले विवाह सोहळ्याचे फोटो

Monday, April 22, 2024

अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या प्रचंड चर्चेत आहे. तेजश्री प्रधान ही दोन ते अडीच वर्षाच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतली आहे. तेजश्रीची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सध्या टीव्हीवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. ‘होणार सुन मी ह्या घरची’ असो किंवा ‘प्रेमाची गोष्ट’ ते अगदी ‘अग्गबाई सासुबाई’ या तेजश्री प्रधानच्या प्रत्येक मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

Tejashri Pradhan: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमुळे तेजश्री प्रधानला करावा लागला ट्रोलिंगचा सामना! काय होतं कारण?

Friday, April 19, 2024

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील ‘नेत्रा’ म्हणजेच अभिनेत्री तितिक्षा तावडे हिने काही दिवसांपूर्वी लग्नगाठ बांधली होती. अभिनेत्री तितिक्षा तावडे हिने अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्याबरोबर सातफेरे घेतले. लग्नाच्या दरम्यान सिद्धार्थ आणि तितिक्षा दोघेही आपापल्या कामांमध्ये प्रचंड व्यस्त होते. एकीकडे तितिक्षाची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सुरू होती. तर, दुसरीकडे सिद्धार्थ देखील त्याच्या मालिका आणि चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. लग्नानंतर या दोघांना फारसा एकत्र वेळ मिळाला नाही.

पतीसोबत गोव्यात धमाल करतेय ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’! शेअर केले पूलमधील सिझलिंग फोटो

Friday, April 19, 2024

आसाममधील गोलाघाट येथील लोहोरे चापोरी येथे मतदानाच्या पहिल्या फेरीच्या पूर्वसंध्येला मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) बोटीने मतदान केंद्रावर नेण्यात आले. यावेळी ईव्हीएम मशींनसह बोटीतून उतरणारे    निवडणूक अधिकारी

Loksabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज! दुर्गम भागातही पोहोचले मतदान यंत्रे; पाहा फोटो

Friday, April 19, 2024

मराठी मालिका आणि चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे अभिनयासोबत, तिच्या सौंदर्यामुळे देखील नेहमी चर्चेत असते. केवळ मराठीच नाही, तर प्रार्थनाने हिंदीतही आपलं नाव गाजवलं आहे. ‘पवित्र रिश्ता’सारख्या गाजलेल्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असते. प्रार्थनाने अभिनय विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख मिळवली आहे. तिचे चित्रपट आणि मालिका देखील प्रचंड गाजल्या आहेत. काहीच महिन्यांपूर्वी तिची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Prarthana Behere: आई होण्याविषयी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचं मोठं वक्तव्य! म्हणाली ‘आम्हाला मूल नको कारण...’

Thursday, April 18, 2024

मराठी मनोरंजन विश्वाची ‘रिक्षावाला गर्ल’ अर्थात अभिनेत्री मानसी नाईक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. काहीच दिवसांपूर्वीच मानसी नाईक हिचा घटस्फोट झाला होता. मानसीने पती प्रदीप खरेरा याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेत सगळ्यांनाच एक मोठा धक्का दिला होता. मात्र, आपला घटस्फोट का झाला, या मागची सगळी कारणे मानसीने चाहत्यांना सांगितली होती. या दरम्यान आता मानसी नाईक तिच्या रिलेशनशिपमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Manasi Naik Relationship: मानसी नाईकच्या आयुष्यात नवं प्रेम; अभिनेत्रीचा ‘मिस्ट्री मॅन’ आला समोर! पाहा फोटो...

Thursday, April 18, 2024