मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची विकेट काढणारी उत्कर्षा आहे तरी कोण? या दिवशी करणार लग्न

Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची विकेट काढणारी उत्कर्षा आहे तरी कोण? या दिवशी करणार लग्न

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 28, 2023 03:59 PM IST

ruturaj gaikwad-utkarsha: ऋतुराज गायकवाडला WTC FINAL ला मुकावे लागणार आहे. ५ जूनपर्यंत तो संघात सामील होऊ शकतो. पण, प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याच्या बदली खेळाडूची मागणी केली. त्यानंतर आता यशस्वी जैस्वाल ऋतुराजचा बदली खेळाडू म्हणून इंग्लंडला जाणार आहे.

ruturaj gaikwad
ruturaj gaikwad

who is ruturaj gaikwad girlfreind utkarsha : चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋतुराज त्याची गर्लफ्रेंड उत्कर्षासोबत ३ ते ४ जून दरम्यान लग्न करू शकतो. ऋतुराजने बीसीसीआयलाही तसे कळवले आहे की, तो ३-४ जूनला लग्न करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या कारणास्तव, ऋतुराज गायकवाडला  WTC FINAL ला मुकावे लागणार आहे. ५ जूनपर्यंत तो संघात सामील होऊ शकतो. पण, प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याच्या बदली खेळाडूची मागणी केली. त्यानंतर आता यशस्वी जैस्वाल ऋतुराजचा बदली खेळाडू म्हणून इंग्लंडला जाणार आहे.

ऋतुराज गायकवाड लग्न करणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर महेंद्रसिंग धोनीचा हा पॉवर हिटर कोणाशी लग्न करणार आहे हा एकच प्रश्न सगळ्यांच्या पडला आहे. ऋतुराजच्या आयुष्याचा जोडीदार कोण होणार? याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.

दरम्यान, ऋतुराज ज्या मुलीशी लग्न करणार आहे, तिचे नाव उत्कर्षा आहे. दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. ऋतुराज उत्कर्षासोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.

कोण आहे उत्कर्षा?

गेल्या वर्षी उत्कर्षा एका जिम सेशनमध्ये ऋतुराजसोबत दिसली होती. मात्र, असे असूनही ऋतुराजच्या चाहत्यांसाठी उत्कर्षा ही एक मिस्ट्री गर्लच राहिली. कारण उत्कर्षा सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह दिसत नाही. तसेच ऋतुराजने कधीही उत्कर्षाचा कोणताही फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलेला नाही. दोघेही अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. पण, कोणालाच त्यांच्या नात्याविषयी जास्त माहिती नाही.

ऋतुराज आणि सायली संजीवच्या अफेयरची चर्चा

याआधी ऋतुराज गायकवाडचे मराठी अभिनेत्री सायली संजीवसोबत लिंक अपच्या बातम्या समोर आल्या होत्या. मे २०२१ मध्ये सायली संजीवसोबतच्या इन्स्टाग्राम चॅटमुळे दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

ऋतुराज आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये खेळताना दिसणार आहे. आतापर्यंत १५ सामन्यांमध्ये त्याने ५६४ धावा केल्या आहेत. ऋतुराजने ४ अर्धशतके झळकावली आहेत.

WhatsApp channel