मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli : विराट कोहली कोणता स्मार्टफोन वापरतो? माहीत आहे का? जाणून घ्या

Virat Kohli : विराट कोहली कोणता स्मार्टफोन वापरतो? माहीत आहे का? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 25, 2023 06:33 PM IST

Virat Kohli Smartphone : विराट कोहलीने इंस्टाग्रामवर स्मार्टफोनसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यानंतर तो कोणता स्मार्टफोन वापरतो यावरून चर्चा रंगली आहे.

Virat Kohli Smartphone
Virat Kohli Smartphone

Virat Kohli Smartphone : विराट कोहलीची गणना जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंमध्ये केली जाते. या खेळाडूचे इंस्टाग्रामवर २०९ मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत. भारताच्या या माजी कर्णधाराचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत. विराट कोहली क्रिकेटच्या मैदानापासून ते वैयक्तिक आयुष्यात कोणत्या गोष्टी वापरतो, हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. पण विराट कोहली कोणता फोन वापरतो हे तुम्हाला माहिती आहे का? खरंतर, विराट कोहली कोणता फोन वापरतो यावरून सतत अटकळ बांधली जाते. पण आता या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने नुकताच विराट कोहलीचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो दोन स्मार्टफोनसोबत दिसत आहे. कोहलीच्या हातात एक अॅपल आयफोन आहे आणि दुसरा फोल्डेबल स्मार्ट फोन आहे. फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत जवळपास १ लाख रुपये आहे. तर आयफोनची किंमत १ लाख रुपयांच्या पुढे आहे. यापूर्वी त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती. त्या फोटोमध्ये तो फोनसोबत दिसत आहे. विराट कोहलीच्या हातातील फोनचा रंग निळा आहे. तसेच त्याने कॅप्शनमध्ये " माय फेव्हरेट शेड ऑफ ब्लू' असे लिहिले आहे.

 

मात्र, यानंतर विराट कोहलीचे चाहते आणि गॅझेटच्या जाणकारांना प्रश्न पडला की, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली कोणता फोन वापरत आहे? विराट कोहली वापरत असलेला फोन कोणत्या ब्रँडचा आहे?

विराट कोहली Vivo V25 सिरीजचा फोन वापरतोय?

मात्र, याशिवाय विराट कोहली आयफोनही वापरतो आहे. तथापि, गॅजेट तज्ञांच्या मते, विराट कोहलीच्या हातात दिसणारा फोन Vivo V25 सीरीजचा फोन आहे. विवोने हा फोन अधिकृतरीत्या लॉन्च केला गेला नसला तरी, विराट कोहली हा विवोचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्यामुळे हा फोन लॉन्च होण्यापूर्वीच विराटकडे असणे फार मोठी गोष्ट नाही. यावरून तो Vivo V25 हा फोन वापरत आहे, असा अंदाज लावला जात आहे. मात्र, सोशल मीडियावरील अनेक चाहत्यांच्या मते हा मार्केटिंग स्टंटदेखील असू शकतो, असे बोलले जात आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या