मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat & Rohit: लाखमोलाचा व्हिडीओ... मालिका जिंकल्यानंतर रोहित-विराटनं एकमेकांना मारली मिठी
VIRAT KOHLI ROHIT SHARMA
VIRAT KOHLI ROHIT SHARMA

Virat & Rohit: लाखमोलाचा व्हिडीओ... मालिका जिंकल्यानंतर रोहित-विराटनं एकमेकांना मारली मिठी

26 September 2022, 12:13 ISTRohit Bibhishan Jetnavare

Virat Kohli and Rohit Sharma celebration ind vs aus: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका २-१ ने जिंकली आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने तिसरा सामना ६ विकेट्सनी जिंकला.

टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकली आहे. तिसऱ्या सामन्यात भारताने कांगारूंचा ६ गडी राखून पराभव केला. अशा प्रकारे भारतीय संघाने मालिका २-१ अशी खिशात घातली. या सामन्यात प्रथम खेळताना ऑस्ट्रेलियाने ७ गड्यांच्या मोबदल्यात १८६ धावा केल्या. कॅमेरून ग्रीन आणि टीम डेव्हिडने अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात टीम इंडियाने १९.५ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.

ट्रेंडिंग न्यूज

भारताकडून विराट कोहली आणि सूर्यकुमार यांनी अर्धशतके ठोकली. तर डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत ३ बळी घेतले.

या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात चांगली बॉन्डिंग पाहायला मिळाली. विराट कोहली अर्धशतक करून तंबूत परतला, तेव्हा रोहित शर्माने त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्यानंतर शेवटच्या षटकातील ५ व्या चेंडूवर हार्दिक पांड्याने चौकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तेव्हा दोघांनीही मैदानात एकच जल्लोष केला. दोघांनी एकमेकांना मिठी मारून विजय साजरा केला.

विराट सुर्याची शतकी भागिदारी

सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने ३० धावांत २ विकेट गमावल्या होत्या. सलामीवीर केएल राहुल पहिल्याच षटकात डॅनियल सॅम्सचा बळी ठरला. त्याचवेळी रोहित शर्मा १४ चेंडूत १७ धावा करून पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर सूर्यकुमार आणि विराट कोहली यांनी शतकी भागीदारी करत विजयाचा पाया रचला. सूर्यकुमारने अतिशय आक्रमक फलंदाजी केली. त्याने ३ चेंडूत ६९ धावा केल्या. त्याने ५ चौकार आणि ५ षटकार मारले.

त्यानंतर विराटने सुत्रे हाती घेतली. मात्र, विराट कोहली २० व्या षटकात ४८ चेंडूत ६३ धावा करून बाद झाला. विराटने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये कोहलीला फारशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र अखेरच्या सामन्यात पुन्हा एकदा त्याने लय पकडली आहे. याआधी त्याने टी-२० आशिया कपमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकं झळकावली होती.