मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Babar Azam: बाबर आझम रोहित शर्माच्या स्पेशल क्लबमध्ये, अशी कामगिरी करणारा जगातला तिसराच फलंदाज

Babar Azam: बाबर आझम रोहित शर्माच्या स्पेशल क्लबमध्ये, अशी कामगिरी करणारा जगातला तिसराच फलंदाज

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 23, 2022 11:28 AM IST

Babar Azam Equals Rohit Sharma Record: बाबर आझमने इंग्लंडविरुद्ध नाबाद ११० धावांची खेळी केली. यासह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. बाबरने भारताच्या रोहित शर्मा आणि स्वित्झर्लंडच्या फहीम नाझीरच्या खास विक्रमाची बरोबरी केली आहे.

Babar Azam
Babar Azam

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना पाकिस्तानने १० विकेटने जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. हा सामना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या शानदार शतकामुळे काय लक्षात राहणार आहे. बाबरने या सामन्यात नाबाद ११० धावा केल्या आणि एकाचवेळी अनेक विक्रम केले.

कर्णधार म्हणून टी-२० मध्ये दोन शतके

या शतकी खेळीनंतर बाबरने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्वित्झर्लंडचा फहीम नझीर यांच्या खास क्लबमध्येही स्थान मिळवले आहे. कर्णधार म्हणून बाबरने टी-२० मधील दुसरे शतक झळकावले. यासह, आंतरराष्ट्रीय T20 मध्ये कर्णधार म्हणून दोन शतके ठोकणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.

बाबर आझमच्या आधी भारताच्या रोहित शर्माने कर्णधार असताना T20 मध्ये दोन शतके झळकावली आहेत. त्याचवेळी स्वित्झर्लंडच्या फहीम नजीरनेही अशी कामगिरी केली आहे.

पाकिस्तानकचे मालिकेत जबरदस्त पुनरागमन

इंग्लंडविरुद्धच्या पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. यामुळे पाकिस्तानी खेळाडूंवर जोरदार टीका होत होती. यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानसमोर २०० धावांचे लक्ष्य होते. मात्र, पाकिस्तानने हे लक्ष्य एकही विकेट न गमावत पूर्ण केले.

बाबर-रिझवानची एतिहासिक भागिदारी

पाकिस्तानकडून बाबर आझमने ६६ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ११० धावा केल्या. आझमचे हे T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे शतक आहे. त्याचवेळी रिझवानने केवळ ५१ चेंडूत ८८ धावांची खेळी केली. रिझवानने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ४ षटकार मारले.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीच्या जोडीने २०० हून अधिक धावांची भागीदारी केली आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या