मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma-Dinesh Karthik: रोहित अन् कार्तिकचं चाललंय तरी काय? आधी गळा पकडला आता चक्क किस केलं

Rohit Sharma-Dinesh Karthik: रोहित अन् कार्तिकचं चाललंय तरी काय? आधी गळा पकडला आता चक्क किस केलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 25, 2022 09:33 PM IST

rohit sharma kiss on dinesh karthik helmet: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी20 सामना हैदराबादमध्ये खेळला जात आहे. पहिला टी-20 ऑस्ट्रेलियाने तर दुसरा टी-20 भारताने जिंकला आहे. हा निर्णायक सामना असून जो जिंकेल तो मालिका आपल्या नावावर करेल.

Rohit Sharma-Dinesh Karthik
Rohit Sharma-Dinesh Karthik (twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी हैदराबादमध्ये तिसरा टी-२० सामना सुरु आहे. या निर्णायक सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १८६ धावा केल्या.

दरम्यान, या सामन्यात पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्मा आणि विकेटकीपर दिनेश कार्तिक यांच्या मैत्रीची बॉन्डिंग पाहायला मिळाली.

अक्षर पटेलच्या थ्रोवर दिनेश कार्तिकने ग्लेन मॅक्सवेलला अप्रतिम रनआउट केले. त्यावेळी कर्णधार रोहित शर्माने दिनेश कार्तिकच्या हेल्मेटला किस केले. दोघांचा हा फोटो पाहून सोशल मीडियावरही व्हायरल झाला.

संपूर्ण मालिकेत रोहित आणि कार्तिक यांच्यात जबरदस्त ब्रोमान्स

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टी-20 मालिकेत रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्यात जबरदस्त ब्रोमान्स पाहायला मिळाला. पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्माने दिनेश कार्तिकचा गळा पकडला होता, ज्यावर बरेच मीम्स बनले होते. तसेच तो व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता.

तर दुसऱ्या T20 सामन्यात रोहित आणि दिनेश कार्तिकच्या जोडीने भारताला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली. आणि आता तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा दिनेश कार्तिकच्या हेल्मेटला किस करताना दिसला.

भारतासमोर १८७ धावांचे लक्ष्य

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १८६ धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने २१ चेंडूत ५२ तर टीम डेव्हिडने २७ चेंडूत ५४ धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून अक्षर पटेलने ३ बळी घेतले.

दोन्ही प्लेइंग-११

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया : अॅरॉन फिंच (कर्णधार), जोस इंग्लिस, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टिम डेव्हिड, कॅमरुन ग्रीन, अॅडम झाम्पा, पॅट कमिन्स, जोस हेझलवूड, नॅथन एलिस.

WhatsApp channel

संबंधित बातम्या