मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Tushar Deshpande: रोहित शर्माचा अपमान केलाच नाही! मीडियातील चर्चेवर तुषार देशपांडेचा खुलासा

Tushar Deshpande: रोहित शर्माचा अपमान केलाच नाही! मीडियातील चर्चेवर तुषार देशपांडेचा खुलासा

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 12, 2023 11:26 AM IST

Tushar Deshpande On Rohit Sharma: रोहित शर्माबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर तुषार पांडेने स्पष्टीकरण दिले आहे.

Tushar Deshpande On Rohit Sharma
Tushar Deshpande On Rohit Sharma

Chennai Super Kings vs Mumbai Indians: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात शनिवारी (८ एप्रिल २०२३) आयपीएल २०२३ मधील १२वा सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नईच्या संघाने सात विकेट्स राखून मुंबईच्या संघाला पराभवाची धुळ चारली. या सामन्यात चेन्नईचा गोलंदाज तुषार पांडेने उत्कृष्ट चेंडू टाकून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता. यानंतर सोशल मीडियावर तुषार देशपांडेने रोहित शर्माबाबत वादग्रस्त विधान केल्याची चर्चा सुरू झाली. यावर तुषार देशपांडेने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईविरुद्ध सामन्यात तुषारने रोहितला वेगळ्या अंदाजात बोल्ड आऊट केले. त्यानंतर तुषारने रोहित शर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याची चर्चा सुरू झाली. "रोहित शर्माची विकेट घेणे खूप सोपे आहे, तो विराट कोहली किंवा एबी डिव्हिलियर्ससारखा नाही", असे तुषार देशपांडेने म्हटल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले जात आहे. यामुळे मुंबईच्या आणि रोहितच्या चाहत्यांनी तुषार देशपांडेला ट्रोल केले आहे. यावर तुषार देशपांडेने स्पष्टीकरण दिले आहे. हे वक्तव्य पूर्णपणे खोटे असल्याचे त्याने म्हटले आहे. रविवारी रात्री त्यांच्या एका इन्स्टा स्टोरीमध्ये त्याने सोशल मीडियावर चालणाऱ्या अशा बातम्यांचे स्क्रीनशॉट घेतले आणि त्यावर थ्रोबॅक लिहिले. तुषारने आपल्या स्पष्टीकरणात असेही लिहिले आहे की, 'वर उल्लेख केलेल्या सर्व दिग्गज खेळाडूंचा मला पूर्ण आदर आहे. मी अशी अपमानास्पद वक्तव्य कधीच केली नाहीत आणि करणारही नाही. अशा खोट्या बातम्या पसरवणे थांबवा, अशीही विनंती तुषार देशपांडेने केली आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्ध तुषार देशपांडेने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने प्रथम स्फोटक फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि त्यानंतर धोकादायक दिसणाऱ्या टीम डेव्हिडला बाद करून मुंबई संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. तुषारने तीन षटकांत ३१ धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यात मुंबई संघाला केवळ १५७ धावा करता आल्या, प्रत्युत्तरात अजिंक्य रहाणेच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईच्या संघाने सात विकेट्स राखून हा सामना जिंकला.

WhatsApp channel

विभाग