मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Wrestlers Protest: दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांचा जबाब नोंदवला; एसआयटी पथकाकडे पुढील तपास

Wrestlers Protest: दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांचा जबाब नोंदवला; एसआयटी पथकाकडे पुढील तपास

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 12, 2023 01:50 PM IST

Brij Bhushan: दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.

Brij Bhushan
Brij Bhushan

Delhi Police: रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी देशातील दिग्गज कुस्तीपटूंनी दिल्लीत आंदोलन पुकारले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज ब्रिजभूषण यांचा जबाब नोंदवून घेतला. ब्रिजभूषण यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एसआयटी पथकाची स्थापना करुन ब्रिजभूषण यांच्याकडून काही कागदपत्रेही मागविण्यात आली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

ब्रिजभूषण सिंह आज दिल्ली पोलिसांसमोर हजर झाले. यावेळी ब्रिजभूषण यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले. चार महिला पोलिस अधिकार्‍यांसह सहा पोलिस पथकांसह एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एका महिला डीसीपीच्या देखरेखीखाली दहा जणांची टीम तयार करण्यात आली होती.

डब्ल्यूएफआयचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचेही जबाब नोंदवण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. विनोद तोमर हे दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्येही आरोपी आहेत. ब्रिजभूषण यांनी त्यांच्या स्पष्टीकरणात काही व्हिडिओ पुरावे आणि मोबाइल डेटा गोळा करण्यास सांगितले.

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर भारतीय कुस्ती महासंघात आर्थिक गैरव्यवस्थापन, मनमानी कारभार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासह त्यांच्यावर लैंगिक छळाचेही आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, २०१२ ते २०२२ या काळात ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून लैंगिक गैरवर्तन करण्यात आल्याचे कुस्तीपटूंनी म्हटले. हे लैंगिक गैरवर्तन ब्रिजभूषण यांच्या दिल्लीमधील बंगल्यात, देशांतर्गत तसेच परदेशात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेदरम्यान झाले आहे, असा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे.

WhatsApp channel

विभाग