sakshi dhoni and anushka sharma studied in same school : विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी किती चांगले मित्र आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे. दोघेही अनेक वर्षे एकत्र क्रिकेट खेळले आहेत. विराट कोहली महेंद्रसिंह धोनीचा खूप आदर करतो. पण तुम्हाला माहित आहे का की, साक्षी धोनी आणि अनुष्का शर्मा या एकमेकांच्या बालपणीच्या मैत्रिणी आहेत आणि दोघींनी एकाच शाळेत शिक्षण घेतले आहे.
होय, तुम्ही बरोबर वाचलं. अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी या बालपणीच्या मैत्रिणी असून दोघीही आसाममधील एकाच शाळेत एकत्र शिकल्या. अनुष्का शर्माचे वडील आर्मी ऑफिसर होते आणि ते आसाममध्ये सेवा देत होते. यादरम्यान अनुष्का शर्मा आसाममधील सेंट मेरी स्कूलमध्ये शिकत होती आणि योगायोगाने साक्षी धोनीही तिच्यासोबत त्याच शाळेत शिकत होती.
नुकतेच या दोघींचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोंमध्ये अनुष्का आणि साक्षी दिसत आहेत.
दरम्यान, शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनीने वेगवेगळे करिअर निवडले. अनुष्का शर्माने अभिनय क्षेत्रात आपले करिअर करायचा निर्णय घेतला. तर साक्षी धोनी हॉटेल मॅनेजमेंटकडे वळली. धोनी आणि साक्षीची भेटही एका हॉटेलमध्येच झाली होती.
या पहिल्या भेटीनंतर माही आणि साक्षीमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २०१० मध्ये धोनी-साक्षीने लग्न केले. दुसरीकडे, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एका शॅम्पूच्या जाहिरातीदरम्यान भेटले होते, त्यानंतर दोघेही मित्र झाले आणि हळूहळू एकमेकांच्या जवळ आले. यानंतर ११ डिसेंबर २०१७ रोजी दोघांनी लग्न केले.