मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB In IPL 2023 : चार सामने हरलेल्या आरसीबीसाठी आनंदाची बातमी, प्लेसिस-विराटचा मोठा कारनामा

RCB In IPL 2023 : चार सामने हरलेल्या आरसीबीसाठी आनंदाची बातमी, प्लेसिस-विराटचा मोठा कारनामा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 28, 2023 07:10 PM IST

RCB In IPL 2023 : यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली सुरुवात होऊनही आरसीबीला लय कायम ठेवता येत नाहीये. आठपैकी चार सामन्यांमध्ये संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

Orange Cap Race In IPL 2023
Orange Cap Race In IPL 2023 (IPL Twitter)

Orange Cap Race In IPL 2023 : यंदाच्या आयपीएलमध्ये बलाढ्य मुंबईला आस्मान दाखवत स्पर्धेची सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहे. कोहलीचा संघाला गेल्या आठ सामन्यांपैकी चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळं आता आरसीबीसाठी प्लेऑफचा मार्ग खडतर होण्याची शक्यता आहे. आरसीबीच्या संपूर्ण आठ सामन्यांमध्ये कर्णधार विराट कोहली, फाफ डू प्लेलिस, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज हे खेळाडू वगळता कुणालाही चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्याचा फटका संघाला बसताना दिसत आहे. परंतु आता सतत आरसीबी हरत असताना विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस मात्र खोऱ्याने धावा काढत आहे. त्यामुळं आता आयपीएलमधील ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये दोघांनी दबदबा कायम ठेवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आयपीएल सुरू झाल्यापासून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी आरसीबीला जवळपास प्रत्येक सामन्यात दमदार सुरुवात करून दिलेली आहे. त्यामुळं दोन्ही खेळाडू ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये टॉपला आहे. फाफ डू प्लेसिस पहिल्या तर विराट कोहली ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. प्लेसिसने आठ सामन्यांत १६७.४७ च्या स्ट्राइक रेटने तब्बल ४२२ धावा कुटल्या आहे. तर विराट कोहलीने ४७.५७ च्या सरासरीने ३३३ धावा चोपल्या आहे. त्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जचा सलामीवीर डेव्हान कॉन्वे (३२२ धावा) तिसऱ्या तर मराठमोळा ऋतुराज गायकवाड (३१७ धावा) चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सात सामन्यांत ३०६ धावा करत ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये पाचवा क्रमांक मिळवला आहे.

PBKS vs LGS IPL 2023 : पंजाबने टॉस जिंकला, लखनौची प्रथम फलंदाजी

पर्पल कॅपमध्ये आरसीबीचा गोलंदाज पहिल्या क्रमांकावर...

ऑरेंज कॅपच्या यादीत आरसीबीचे दोन फलंदाज अग्रस्थानी आहेत. तशीच काहीशी स्थिती पर्पल कॅपचीही आहे. कारण आरसीबीचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद सिराजने आठ सामन्यांत १४ विकेट्स घेत पर्पल कॅपवर दावा ठोकला आहे. त्यानंतर राशिद खान (गुजरात), तुषार देशपांडे (सीएसके) आणि वरुण चक्रवर्ती (केकेआर) यांचा नंबर लागतो. त्यामुळं आता आयपीएलचे निम्मे सामने संपत आलेले असलताना आयपीएलच्या पर्पल आणि ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये आरसीबीच्याच खेळाडूंचा वरचष्मा असल्याचं दिसून येत आहे.

WhatsApp channel