मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL Prize Money : इमर्जिंग प्लेयर, सुपर स्ट्रायकर ते आयपीएल चॅम्पियन; कोणाला किती बक्षीस रक्कम मिळणार? पाहा

IPL Prize Money : इमर्जिंग प्लेयर, सुपर स्ट्रायकर ते आयपीएल चॅम्पियन; कोणाला किती बक्षीस रक्कम मिळणार? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 26, 2023 05:45 PM IST

IPL 2023 Prize Money And Award Details : ऑरेंज कॅप सध्या फाफ डुप्लेसिसकडे आहे. पण शुभमन गिल डुप्लेसिसपेक्षा केवळ ८ धावांनी मागे आहे. अशा स्थितीत शुभमन ऑरेंज कॅप मिळवू शकतो. तर पर्पल कॅपच्या शर्यतीत मोहम्मद शमी आघाडीवर आहे. शमीनंतर राशीद खान दुसऱ्या क्रमांकावर आहे.

IPL 2023 Prize Money
IPL 2023 Prize Money

चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने IPL 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर आता क्वालिफायर-2 मध्ये आज (२६ मे) गतविजेत्या गुजरात टायटन्सचा (GT) सामना मुंबई इंडियन्सशी (MI) होणार आहे. गुजरात टायटन्सला क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध १५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे रोहित ब्रिगेडने एलिमिनेट सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर ८१ धावांनी विजय मिळवला. उभय संघांमधील हा ब्लॉकबस्टर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जाईल.

आजचा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये एन्ट्री करेल. तर पराभूत संघाचा प्रवास येथेच संपेल. या मोसमातील विजेत्यासोबतच उपविजेत्यालाही कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. याशिवाय ऑरेंज कॅप विजेत्या आणि पर्पल कॅप विजेत्या खेळाडूंनाही लाखो रुपये देण्यात येणार आहेत.

आयपीएल 2033 मध्ये खेळाडूंना हे पुरस्कार मिळणार

IPL विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळेल?

आयपीएल 2023च्या विजेत्या संघाला २० कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत.

उपविजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळेल?

आयपीएल 2023च्या अंतिम सामन्यात पराभूत होणार्‍या संघाला बक्षीस म्हणून १३ कोटी रुपये दिले जातील.

ऑरेंज कॅप विजेत्याला किती बक्षीस रक्कम मिळेल?

आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला बक्षीस म्हणून १५ लाख रुपये दिले जातील.

पर्पल कॅप विजेत्याला किती बक्षीस रक्कम मिळेल?

आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक विकेट मिळवून पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला १५ लाख रुपये दिले जातील.

सुपर स्ट्रायकर पुरस्कार विजेत्याला किती पैसे मिळणार?

आयपीएल 2023 मध्ये सुपर स्ट्रायकर पुरस्कार जिंकणाऱ्या फलंदाजाला बक्षीस म्हणून १५ लाख रुपये दिले जातील.

उदयोन्मुख खेळाडूला (इमर्जिंग प्लेयर) किती रक्कम मिळेल?

१ एप्रिल १९९५ नंतर जन्मलेले आणि ५ पेक्षा कमी कसोटी तसेच, २० पेक्षा कमी एकदिवसीय सामने खेळलेल्या खेळाडूंचा या पुरस्कार यादीत समावेश आहे. याशिवाय त्या खेळाडूने आयपीएलमध्ये 25 पेक्षा कमी सामने खेळले असावेत. या हंगामात उदयोन्मुख खेळाडू पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूला बक्षीस म्हणून 20 लाख रुपये दिले जातील.

WhatsApp channel