मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 Final : आकडेवारी सांगतेय ९ पैकी ७ वेळा 'असं' घडलंय, आयपीएल धोनीची सीएसकेच जिंकणार!

IPL 2023 Final : आकडेवारी सांगतेय ९ पैकी ७ वेळा 'असं' घडलंय, आयपीएल धोनीची सीएसकेच जिंकणार!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 27, 2023 05:44 PM IST

ipl 2023 final CSK VS GT : ipl 2023 चा अंतिम सामना २८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

ipl 2023 final CSK VS GT
ipl 2023 final CSK VS GT

CSK vs GT, Indian Premier League Final : आयपीएल 2023 चा अंतिम सामना २८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात खेळवला जाणार आहे. या आयपीएल मोसमाची सुरुवातही दोन्ही संघांमधील सामन्यानेच झाली होती. यानंतर क्वालिफायर 1 सामनाही चेन्नई आणि गुजरात यांच्यात खेळला गेला. आता हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात पुन्हा आमनेसामने येणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अंतिम सामन्यात दोन्ही संघांचे पारडे जड दिसत आहे. पण आतापर्यंतच्या आयपीएल फायनल सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा वरचष्मा असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. क्वालिफायर 1 सामना खेळणाऱ्या संघांमध्येच अंतिम सामना झाल्याचे आयपीएलच्या इतिहासात ९ वेळा पाहायला मिळाले आहे.

क्वालिफायर 1 जिंकणारा संघच चॅम्पियन बनतो

आता या हंगामातही असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. तसेच, ज्या संघाने क्वालिफायर 1 सामना जिंकला आहे, त्याच संघाने आयपीएल फायनलही जिंकली आहे, असे ९ पैकी ७ वेळा झाले आहे. अशा स्थितीत गतविजेत्या गुजरात टायटन्ससाठी अंतिम सामना जिंकणे सोपे नसेल.

IPL 2022 मध्ये पहिला क्वालिफायर सामना गुजरात आणि राजस्थान संघांमध्ये खेळला गेला. यामध्ये गुजरातने विजय मिळवत थेट अंतिम फेरीत धडक मारली होती. यानंतर अंतिम सामन्यात पुन्हा राजस्थान-गुजरात आमने सामने आले आणि गुजरातने विजय मिळवून ट्रॉफी जिंकली.

या बाबतीत जर आपण चेन्नई सुपर किंग्जचा रेकॉर्ड पाहिला तर २०११ च्या मोसमापासून ५ वेळा क्वालिफायर 1 सामना खेळल्यानंतर त्यांनी त्याच संघासोबत अंतिम सामनाही खेळला आहे. यामध्ये त्यांनी २०१३ च्या क्वालिफायर 1 सामन्यात मुंबईचा पराभव केला होता, मात्र अंतिम फेरीत त्यांना मुंबईकडून २३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

याशिवाय २०११ साली चेन्नईने क्वालिफायर 1 आणि फायनलमध्ये आरसीबीचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. २०१५ च्या मोसमात चेन्नईला क्वालिफायर 1 आणि फायनलमध्ये मुंबईविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

२०१८ मध्ये चेन्नईने क्वालिफायर 1 मध्ये हैदराबादचा पराभव केला आणि त्यानंतर फायनलमध्येही त्यांनी हैदराबादला धुळ चारली. २०१९ आयपीएल च्या मोसमात, मुंबईने क्वालिफायर 1 आणि फायनल या दोन्हीमध्ये चेन्नईचा पराभव केला होता.

WhatsApp channel