T20 WC: वर्ल्डकपनंतर काय होईल कोणाला माहीत? म्हणून आताच मॅच बघायला आलो; दिनेश कार्तिकचे वडील भावूक
T20 World Cup 2022 : टी-ट्वेंटी विश्वचषकात दिनेश कार्तिकची फलंदाजी पाहण्यासाठी त्याचे वडील कृष्ण कुमार हे ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
dinesh karthik father Reaction: टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारतानं पाकिस्तानला धूळ चारत विजयी सलामी दिली आहे. विराट कोहलीच्या तडाखेबंद खेळीनं भारतानं पाकिस्तानवर अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. परंतु टी-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सर्वांच्या नजरा दिनेश कार्तिकच्या फलंदाजीवर आहे. गेली अनेक वर्ष फॉर्मात नसलेल्या दिनेशची बॅट यंदाच्या आयपीएलमध्ये चांगलीच तळपली. त्यानंतर त्याची वर्ल्डकपसाठी संघात निवड झाली. सध्या कार्तिकचं वय ३७ असल्यानं त्याच्या अनुभवाचा भारतीय संघाला मोठा फायदा होणार आहे. परंतु आता आपल्या मुलाची फलंदाजी पाहण्यासाठी दिनेशचे वडील कृष्ण कुमार हे देखील ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
माध्यमांशी बोलताना कार्तिकचे वडील कृष्ण कुमार म्हणाले की, मी कधीही दिनेशला खेळताना टिव्हीवर किंवा मैदानावर पाहिलेलं नाही. परंतु आता हा टी-ट्वेंटी वर्ल्डकप त्याची शेवटची स्पर्धा असल्यानं मी ऑस्ट्रेलियात आलो आहे, मला माहिती नाही की या वर्ल्डकपनंतर काय होईल, म्हणून मी त्याची फलंदाजी पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियात आलो आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया दिनेश कार्तिकच्या वडिलांनी दिली आहे.
दिनेश कार्तिकचे वडील कृष्ण कुमार काल ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत. त्यावेळी त्यांनी सिडनीच्या मैदानावर दिनेशला सराव करताना पाहिलं. मी व्यावहारिक असून मला त्याला ऑस्ट्रेलियात खेळताना पाहायचं आहे, कारण या स्पर्धेनंतर त्याचं काय होईल, याची मला कल्पना नाही. कृष्ण कुमार हे आज भारत-नेदरलॅंड्समध्ये होणाऱ्या टी-ट्वेंटी सामन्यासाठी उपस्थित असणार आहेत. याशिवाय भारताचा पुढचा सामना मेलबर्नमध्ये होणार असून हा सामना पाहण्यासाठीही जाणार असल्याचं कृष्ण कुमार म्हणाले.