मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 World Cup: ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला मिळालं नाही चांगलं जेवण, खेळाडूंनी टाकला बहिष्कार

T20 World Cup: ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला मिळालं नाही चांगलं जेवण, खेळाडूंनी टाकला बहिष्कार

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 26, 2022 10:16 AM IST

T20 World Cup: भारतीय संघ नेदरलँडविरुद्धच्या सामन्याआधी विश्रांती घेईल. कारण आयसीसीने प्रॅक्टिस सेशनसाठी ब्लॅकटाउनची निवड केली आहे. हे मैदान एससीजीपासून ४२ किमी दूर आहे.

ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला मिळालं नाही चांगलं जेवण, खेळाडुंनी टाकला बहिष्कार
ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला मिळालं नाही चांगलं जेवण, खेळाडुंनी टाकला बहिष्कार

T20 World Cup: भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पराभूत करून विजयी सुरुवात केली आहे. आता दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारतीय संघाने ट्रेनिंग सेशननंतर जेवणावर बहिष्कार टाकला. जेवण खूपच थंड आणि अपुरे होते. ड्रेसिंग रुमच्या मेन्यूमध्ये फळे, मेक युवर सँडविच यांचा समावेश होता पण अनेक खेळाडूंना ते आवडले नाही. याबाबतची तक्रार सिडनी क्रिकेट ग्राउंडवर संबंधित अधिकाऱ्यांकडे केली.

कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, केएल राहुल, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, दीपक हुड्डा यांनी ट्रेनिंग सेशनमध्ये भाग घेतला होता. रविवारी मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर संघ व्यवस्थापनाने अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंह यांना विश्रांती दिली होती.

भारतीय संघातील एका सदस्याने सांगितले की, जेवण निकषानुसार नव्हते. सराव सत्रानंतर आम्ही सँडविच नाही खाऊ शकत. काही खेळाडुंनी मैदानावर फळे खाल्ली तर इतरांनी हॉटेलमध्ये जेवण्याचा निर्णय गेतला. भारतीय संघ नेदरलँडविरुद्धच्या सामन्याआधी विश्रांती घेईल. कारण आयसीसीने प्रॅक्टिस सेशनसाठी ब्लॅकटाउनची निवड केली आहे. हे मैदान एससीजीपासून ४२ किमी दूर आहे.

गुरुवारी २७ ऑक्टोबरला सिडनी क्रिकेट ग्राउंडवर डबल हेडर होणार आहे. दक्षिण आफ्रिका बांगलादेशिविरुद्ध खेळेल. त्यानंतर सायंकाळी भारताचा नेदरलँडविरुद्ध सामना होणार आहे. आयसीसीच्या शेड्युलनुसार दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि नेदरलँडला बुधवारी एससीजीमध्ये ट्रेनिंग सेशन आयोजित केलं आहे.

२०२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी भारतीय संघाने ऑलिम्पिक पार्कमध्ये राहून ब्लॅकटाउनमध्ये कॅप लावला होता. मात्र सामन्याच्या आदल्या दिवशी इतका लांबचा प्रवास टीम इंडिया करू इच्छित नाही. आयसीसीने सर्वच भाग घेणाऱ्या संघांसाठीचे शेड्युल आधीच ठरवले होते. मात्र ते शेड्युल पाळायचे की नाही हे त्या संघावर अवलंबून आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या