मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL Auction: यंदाच्या लिलावात ‘हे’ संघ पाडणार पैशाचा पाऊस; कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक?

IPL Auction: यंदाच्या लिलावात ‘हे’ संघ पाडणार पैशाचा पाऊस; कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 22, 2022 12:43 PM IST

IPL Auction 2023 : यंदाच्या आयपीएल हंगामाचा लिलाव उद्या कोचीत होणार आहे. त्यात प्रत्येक संघ तुल्यबळ खेळाडूंना खरेदी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

IPL Auction 2023 Players List
IPL Auction 2023 Players List (HT)

IPL Auction 2023 Players List : आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी उद्या केरळमधील कोचीत लिलाव होणार आहे. या लिलावात भारतासह विदेशातील ऑलराऊंडर आणि फॉर्मात असलेल्या खेळाडूंची खरेदी करण्याचा प्रयत्न अनेक संघाचा असणार आहे. यावेळच्या लिलावात सनरायझर्स हैदराबाद या संघाकडे सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे. तर आरसीबी आणि केकेआर या संघाकडे सर्वात कमी रक्कम शिल्लक आहे. त्यामुळं आता फॉर्मात असलेल्या इंग्लंडचे ऑलराऊंडर बेन स्टोक्स आणि सॅम करन या खेळाडूंवर कोट्यवधी रुपये खर्च करून त्यांना संघात घेण्यासाठी अनेक टिममालक प्रयत्न करणार आहे.

लिलावात कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक?

१. सनरायझर्स हैदराबाद- ४२.२५ कोटी रुपये

२. पंजाब किंग्ज- ३२.२ कोटी रुपये

३. लखनौ सुपरजायंट्स- २३.३५ कोटी रुपये

४. मुंबई इंडियन्स- २०.२५ कोटी रुपये

५. चेन्नई सुपर किंग्ज- २०.४५ कोटी रुपये

६. दिल्ली कॅपिटल्स- १९.४५ कोटी रुपये

७. गुजरात लायन्स-१९.२५ कोटी रुपये

८. राजस्थान रॉयल्स-१३.२ कोटी रुपये

९. रॉयल चॅलेंजर्स-८.७५ कोटी रुपये

१०. कोलकाता नाईट रायडर्स- ७.०५ कोटी रुपये

लिलावाचे नियम काय आहेत?

प्रत्येक टीमला लिलावात त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या रकमेपैकी फक्त ७५ टक्के रक्कम खर्च करता येणार आहे. याशिवाय टीममालकांना राईट टू मॅचचा वापर करण्याचा अधिकार नसेल. याशिवाय प्रत्येक टीममालकांना कमीत कमी १८ आणि जास्तीत जास्त २५ खेळाडूंचा समावेश करता येणार आहे.

लिलावात कोणत्या खेळाडूंवर असेल टिममालकांची नजर?

यंदाच्या आयपीएल लिलावात इंग्लंडचे ऑलराऊंडर बेन स्टोक आणि सॅम करन यांच्याशिवाय आदिल रशीद, कॅमरून ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, ख्रिस लिन, केन विलियमसन, जेसन होल्डर, जीमी निशम आणि निकोलस पूरन या विदेशी खेळाडूंवर टीममालकांची नजर असणार आहे. याशिवाय भारतीय खेळाडूंमध्ये मनिष पांडे आणि मयंक अग्रवाल या दोन खेळाडूंवरही बोली लागण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel

विभाग