मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Morocco Football Team: मोरोक्कन लोकांना संघाचं प्रचंड कौतुक, खुल्या बसमधून खेळाडूंची भव्य मिरवणूक

Morocco Football Team: मोरोक्कन लोकांना संघाचं प्रचंड कौतुक, खुल्या बसमधून खेळाडूंची भव्य मिरवणूक

Dec 21, 2022 08:19 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Morocco football team Grand Welcome, FIFA WC 2022: फिफा वर्ल्डकपमध्ये मोरोक्कोच्या संघानं शानदार कामगिरी केली. मोरोक्कोने सर्वांना आश्चर्यचकित करत फिफा वर्ल्डकपच्या सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती. सेमी फायनलमध्ये त्यांचा पराभव झाला. मात्र, मायदेशात पोहोचल्यानंतर संपूर्ण देशानं फुटबॉल संघाचं यश साजरं केलं आहे. 

FIFA विश्वचषक २०२२ चा थरार संपला आहे. कतारमध्ये २८ दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण ६४ सामने खेळले गेले. अर्जेंटिना या विश्वचषकाचा विजेता ठरला. तर फ्रान्स उपविजेचा. त्याचवेळी क्रोएशियाने या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. तर मोरोक्कोला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
twitterfacebookfacebook
share

(1 / 10)

FIFA विश्वचषक २०२२ चा थरार संपला आहे. कतारमध्ये २८ दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण ६४ सामने खेळले गेले. अर्जेंटिना या विश्वचषकाचा विजेता ठरला. तर फ्रान्स उपविजेचा. त्याचवेळी क्रोएशियाने या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. तर मोरोक्कोला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.(Reuters)

वर्ल्डकपनंतर मोरोक्कोचा संघ मायदेशी परतला आहे. त्यानंतर संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. फिफा वर्ल्डकपमध्ये संघाने थरारक कामगिरी केली, त्याचे कौतुक करण्यासाठी लाखो समर्थक रस्त्यावर उतरले होते. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 10)

वर्ल्डकपनंतर मोरोक्कोचा संघ मायदेशी परतला आहे. त्यानंतर संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. फिफा वर्ल्डकपमध्ये संघाने थरारक कामगिरी केली, त्याचे कौतुक करण्यासाठी लाखो समर्थक रस्त्यावर उतरले होते. (AFP)

यावेळी खेळाडूंची खुल्या बसमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा हजारो चाहत्यांची तुफान गर्दी होती.
twitterfacebookfacebook
share

(3 / 10)

यावेळी खेळाडूंची खुल्या बसमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा हजारो चाहत्यांची तुफान गर्दी होती.(AFP)

मोरोक्कन संघ प्रथमच फिफा वर्ल्डकपच्या सेमी फायनलपर्यंत पोहोचला होता. तसेच फिफा वर्ल्डकपची सेमी फायनल गाठणारा मोरोक्को हा पहिलाच आफ्रिकन संघदेखील ठरला आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 10)

मोरोक्कन संघ प्रथमच फिफा वर्ल्डकपच्या सेमी फायनलपर्यंत पोहोचला होता. तसेच फिफा वर्ल्डकपची सेमी फायनल गाठणारा मोरोक्को हा पहिलाच आफ्रिकन संघदेखील ठरला आहे.(AFP)

 जर मोरोक्कन संघाने उपांत्य फेरीत विजय मिळवला असता तर आणखी एक इतिहास घडला असता. मात्र, सेमी फायनलमध्ये मोरोक्कोचा फ्रान्सने पराभव केला. त्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आणि त्यांचे हे स्वप्न भंगले.
twitterfacebookfacebook
share

(5 / 10)

 जर मोरोक्कन संघाने उपांत्य फेरीत विजय मिळवला असता तर आणखी एक इतिहास घडला असता. मात्र, सेमी फायनलमध्ये मोरोक्कोचा फ्रान्सने पराभव केला. त्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आणि त्यांचे हे स्वप्न भंगले.(AFP)

त्यानंतर तिसऱ्या स्थानासाठी मोरोक्कोची लढत क्रोएशियाशी झाली. या सामन्यातही मोरोक्कोचा पराभव झाला. मात्र, तरी त्यांच्या चाहत्यांना मोरोक्कोच्या संघाच्या कामगिरीवर पूर्ण समाधान आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 10)

त्यानंतर तिसऱ्या स्थानासाठी मोरोक्कोची लढत क्रोएशियाशी झाली. या सामन्यातही मोरोक्कोचा पराभव झाला. मात्र, तरी त्यांच्या चाहत्यांना मोरोक्कोच्या संघाच्या कामगिरीवर पूर्ण समाधान आहे.

मात्र, तत्पूर्वी, मोरोक्कोच्या संघाने ग्रुप स्टेजमध्ये स्पेनचा पराभव केला होता. त्यानंतर राऊंड ऑफ १६ फेरीत त्यांनी बेल्जियमला बाहेरचा रस्ता दाखवला तर क्वार्टर फायनलमध्ये मोरोक्कोने क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाला वर्ल्डकपमधून बाहेर काढले. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 10)

मात्र, तत्पूर्वी, मोरोक्कोच्या संघाने ग्रुप स्टेजमध्ये स्पेनचा पराभव केला होता. त्यानंतर राऊंड ऑफ १६ फेरीत त्यांनी बेल्जियमला बाहेरचा रस्ता दाखवला तर क्वार्टर फायनलमध्ये मोरोक्कोने क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाला वर्ल्डकपमधून बाहेर काढले. (AP)

मोरोक्कोचे चाहते आपल्या संघाचे हे विशेष यश कधीच विसरणार नाहीत. यामुळेच मोरोक्कन देशवासियांनी संघाच्या अनपेक्षित कामगिरीचा असा आनंद साजरा केला आहे.कडेकोट पोलीस बंदोबस्तात रबतच्या रस्त्यावर खुल्या बसमध्ये खेळाडूंची परेड करण्यात आली आणि हजारो लोक त्यांच्या आवडत्या खेळाडूंची झलक पाहण्यासाठी आले. त्यांच्या हातात झेंडे होते आणि ते गाण्यात आणि नाचण्यात मग्न होते.
twitterfacebookfacebook
share

(8 / 10)

मोरोक्कोचे चाहते आपल्या संघाचे हे विशेष यश कधीच विसरणार नाहीत. यामुळेच मोरोक्कन देशवासियांनी संघाच्या अनपेक्षित कामगिरीचा असा आनंद साजरा केला आहे.कडेकोट पोलीस बंदोबस्तात रबतच्या रस्त्यावर खुल्या बसमध्ये खेळाडूंची परेड करण्यात आली आणि हजारो लोक त्यांच्या आवडत्या खेळाडूंची झलक पाहण्यासाठी आले. त्यांच्या हातात झेंडे होते आणि ते गाण्यात आणि नाचण्यात मग्न होते.(Reuters)

मोरोक्कन संघाच्या खेळाडूंनी कोच वालिद रेगारगुई यांच्यासह चाहत्यांच्या शुभेच्छा आणि अभिवादन स्वीकारले. यावेळी खेळाडू खूप खूष दिसत होते. खेळाडूंची ही परेड शाही राजवाड्यापर्यंत काढण्यात आली. त्या ठिकाणी मोरोक्कोचे किंग मोहम्मद सहावे हे खेळाडूंचे ऐतिहासिक यश साजरे करण्यासाठी त्यांची वाट पाहत होते.
twitterfacebookfacebook
share

(9 / 10)

मोरोक्कन संघाच्या खेळाडूंनी कोच वालिद रेगारगुई यांच्यासह चाहत्यांच्या शुभेच्छा आणि अभिवादन स्वीकारले. यावेळी खेळाडू खूप खूष दिसत होते. खेळाडूंची ही परेड शाही राजवाड्यापर्यंत काढण्यात आली. त्या ठिकाणी मोरोक्कोचे किंग मोहम्मद सहावे हे खेळाडूंचे ऐतिहासिक यश साजरे करण्यासाठी त्यांची वाट पाहत होते.(Reuters)

Morocco football team Grand Welcome
twitterfacebookfacebook
share

(10 / 10)

Morocco football team Grand Welcome

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज