मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Cristiano Ronaldo: तो गोल ब्रुनो फर्नांडिसचाच, रोनाल्डोचा नाही; Adidas नं ‘असा' केला खुलासा

Cristiano Ronaldo: तो गोल ब्रुनो फर्नांडिसचाच, रोनाल्डोचा नाही; Adidas नं ‘असा' केला खुलासा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Nov 29, 2022 07:37 PM IST

Cristiano Ronaldo and bruno fernandes FIFA World Cup: पोर्तुगाल फुटबॉल फेडरेशन या गोलबाबत फिफाकडे दाद मागणार असल्याची चर्चा आहे. रोनाल्डोनेच हा गोल केल्याचा पुरावा पोर्तुगाल संघाला फिफाला द्यायचा आहे. मात्र, विश्वचषकासाठी चेंडू तयार करणाऱ्या आदिदास या कंपनीने एक निवेदन जारी केले आहे.

Cristiano Ronaldo & bruno fernandes
Cristiano Ronaldo & bruno fernandes

कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकात सोमवारी (२८ नोव्हेंबर) पोर्तुगाल आणि उरुग्वे यांच्यात सामना झाला. H गटातील या सामन्यात पोर्तुगालने २-० असा विजय मिळवत राऊंड ऑफ १६ फेरीत आपले स्थान निश्चित केले. पोर्तुगालसाठी या सामन्यात ब्रुनो फर्नांडिसने दोन्ही गोल केले. त्याचा पहिला गोल बराच गाजला आणि आतादेखील चर्चेत आहे. पोर्तुगालचा सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डोने त्या गोलवर आपला दावा केला होता, परंतु रेफ्रींनी तो फेटाळून लावला.

त्यामुळे रोनाल्डो थोडासा नाराज दिसला. याची सोशल मीडियावरदेखील बरीच चर्चा रंगली. काही चाहत्यांना असे वाटते की रोनाल्डोने तो गोल केला आहे, तर काहींना वाटते की तो गोल ब्रुनो फर्नांडिसने केला आहे. विशेष म्हणजे यासाठी रोनाल्डोने पत्रकार पियर्स मॉर्गनला मेसेजही केल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. मॉर्गन आणि रोनाल्डो यांची चांगली मैत्री आहे. नुकतीच दोघांदरम्यान झालेली मुलाखत प्रचंड गाजली होती. या मुलाखतीत रोनाल्डोने अनेक खुलासे केले होते.

दरम्यान, पोर्तुगाल फुटबॉल फेडरेशन या गोलबाबत फिफाकडे दाद मागणार असल्याची चर्चा आहे. रोनाल्डोनेच हा गोल केल्याचा पुरावा पोर्तुगाल संघाला फिफाला द्यायचा आहे. मात्र, विश्वचषकासाठी चेंडू तयार करणाऱ्या आदिदास या कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. तो गोल रोनाल्डोने केला नाही तसेच त्याच्या शरीराच्या कोणत्याही भागाला चेंडूचा स्पर्श झालेला नाही, असे अदिदासने स्पष्ट केले आहे.

FIFA World Cup
FIFA World Cup (Adidas /fifa)

ESPN च्या मते, Adidas ने बॉलमध्ये बसवलेल्या सेन्सरद्वारे योग्य डेटा काढला आहे. यावेळी आदिदासने सांगितले की, "हा गोल नेमका कोणी केला. हे जाणून घेण्याासठी फिफा वर्ल्डकपचा ऑफिशिय बॉल अल रिहालामधील स्पेशल कनेक्टेड बॉल टेक्नोलॉजीचा वापर केला. यातून हे स्पष्ट झाले की, तो गोल ब्रुनो फर्नांडिसने केला आहे. तसेच, त्यावेळी रोनाल्डोचा आणि बॉलचा कुठलाही संपर्क झाला नाही.

FIFA World Cup
FIFA World Cup (Adidas /fifa)

हा सगळा प्रकार ५४व्या मिनिटाला घडला. गोल झाल्यानंतर रोनाल्डोला वाटले की, तो त्यानेच केला आहे. परंतु फर्नांडिसच्या क्रॉसनंतर चेंडू नेटमध्ये गेल्याने तो गोल रेफ्रिंनी फर्नांडिसला दिला.

WhatsApp channel

संबंधित बातम्या