मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs NZ Weather Report: टीम इंडिया मालिका हरणार? तिसरा सामना होण्याची शक्यता कमीच

IND vs NZ Weather Report: टीम इंडिया मालिका हरणार? तिसरा सामना होण्याची शक्यता कमीच

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Nov 29, 2022 06:19 PM IST

india vs new zealand 3rd odi: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उद्या क्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंडविरुद्ध तिसरा वनडे सामना खेळणार आहे. पहिला सामना जिंकून न्यूझीलंडचा संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. अशा स्थितीत हा सामना अत्यंत महत्त्वाचा असला तरी त्यावर पावसाचे सावट आहे.

india vs new zealand weather
india vs new zealand weather

christchurch weather forecast india vs new zealand 3rd odi: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी (३० नोव्हेंबर) होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ७ वाजता क्राइस्टचर्चमध्ये सुरू होईल. पहिला सामना जिंकून न्यूझीलंडचा संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला.

आता तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यावर पावसाचे सावट आहे. हा तिसरा सामनाही पावसामुळे वाहून गेला, तर त्याचा फायदा न्यूझीलंडला होईल. ते मालिका १-० ने जिंकतील. जर हा सामना झाला तर टीम इंडिया तो जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.

बुधवारी क्राइस्टचर्चमधील हवामानाचा अंदाज

AccuWeather नुसार, क्राइस्टचर्चमध्ये बुधवारी पावसाची ७६ टक्के शक्यता आहे. हा अंदाज खरा ठरला तर सामना होण्याची शक्यता कमी आहे. क्राइस्टचर्चमध्ये कमाल तापमान १८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता ८७ टक्क्यांपर्यंत आहे.

क्राइस्टचर्चमधील हेगली ओव्हल मैदान पारंपारिकपणे सीम बॉलर्ससाठी अनुकूल आहे. या मैदानावरचा सरासरी स्कोर २३० धावा आहे. 

दोन्ही देशांचे संघ

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, दीपक चहल, दीपक चहल. , शार्दुल ठाकूर आणि उमरान मलिक.

न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, डेव्हिन कॉनवे, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, टिम साउथी, मॅट हेन्री, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन.

WhatsApp channel