मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Dhoni-Ganguly : प्रिन्स आणि सुपर किंगची ग्रेट भेट… या व्हायरल फोटोमागची स्टोरी काय?

Dhoni-Ganguly : प्रिन्स आणि सुपर किंगची ग्रेट भेट… या व्हायरल फोटोमागची स्टोरी काय?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 04, 2023 11:14 AM IST

Dhoni-Ganguly Photo viral : भारतीय संघाच्या दोन माजी दिग्गज कर्णधारांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान भेट ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे.

Dhoni-Ganguly Photo viral
Dhoni-Ganguly Photo viral

MS Dhoni And Sourav Ganguly : चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) आगामी मोसमाची तयारी सुरू केली आहे. अलीकडेच, त्याचा नेटमध्ये फिरकी गोलंदाजांना षटकार ठोकतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला होता.

ट्रेंडिंग न्यूज

त्याचवेळी आता आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारताचे दोन माजी कर्णधार सौरव गांगुली आणि धोनी एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहे.

गांगुली आणि महेंद्रसिंग धोनीची दिल्लीत एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान भेट ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर चेन्नई सुपर किंग्सने "जेव्हा प्रिन्स सुपर किंगला भेटला" अशा कॅप्शनसह दोन माजी कर्णधारांचा फोटो शेअर केला आहे.

आगामी आयपीएल सीझनमध्ये सौरव गांगुलीला दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचा संचालक बनवण्यात आले आहे. तर दुसरीकडे, महेंद्रसिंग धोनीबद्दल बोलायचे झाले तर, धोनी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आहे. हे धोनीचे शेवटचे आयपीएल सीझन असेल असेही मानले जात आहे. सोबतच, महेंद्रसिंग धोनीने आधीच स्पष्ट केले होते की तो त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्जच्या होम ग्राउंडवर खेळणार आहे.

चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएलचा गेला हंगाम अतिशय वाईट ठरला. या हंगामात त्यांनी १४ पैकी केवळ ४ सामने जिंकले होते.

WhatsApp channel