मराठी बातम्या  /  क्रीडा  /  DC vs GT: दिल्लीत आज पावसाचा खेळ?; दिल्ली- गुजरात सामना रद्द होण्याची शक्यता

DC vs GT: दिल्लीत आज पावसाचा खेळ?; दिल्ली- गुजरात सामना रद्द होण्याची शक्यता

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 04, 2023 01:01 PM IST

DC vs GT Match Weather Report: दिल्ली कपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात पाऊस व्यत्यय आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Arun Jaitley Stadium
Arun Jaitley Stadium

Delhi Capitals vs Gujarat Titans Match Weather Report: दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज (०४ एप्रिल २०२३) आयपीएल २०२३ मधील सातवा सामना खेळला जाणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मात्र, हा सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीत आज पहाटे पावसाने हजेरी लावली होती. यामुळे दिल्ली- गुजरात यांच्यातील सामना होऊ शकेल की नाही? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

दिल्लीत मंगळवारी पहाटे झालेल्या पावसामुळे शहरातील तापमान १९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार, दिल्लीत आज मध्य स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. संध्याकाळी १० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु हवामान स्वच्छ राहील आणि ताशी 10-15 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच अनेक भागात धुके पडण्याची शक्यता आहे.

हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. येथील खेळपट्टी संथ आहे. तर, अनेकदा आउटफिल्ड वेगवान असते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य ठेवावे लागेल. या खेळपट्टीवर फिरकीपटूंना अधिक मदत मिळू शकते.

दिल्लीचा संभाव्य संघ:

पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, सरफराज खान, रोवमन पॉवेल, अमन खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद/मनीष पांडे

गुजरातचा संभाव्य संघ:

शुभमन गिल, ऋद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, जोश लिटल, मोहम्मद शमी, यश दयाल/साई सुदर्शन

WhatsApp channel

विभाग