मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Anushka Sledge Kohli : विकेटकीपर अनुष्का म्हणाली, आज तो रन बना ले कोहली, विराटनंही दिलं जबरदस्त उत्तर, पाहाच!

Anushka Sledge Kohli : विकेटकीपर अनुष्का म्हणाली, आज तो रन बना ले कोहली, विराटनंही दिलं जबरदस्त उत्तर, पाहाच!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 27, 2023 11:04 PM IST

Anushka Sharma Sledge Virat Kohli : नुकतेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा पुमाच्या 'लेट देअर बी स्पोर्ट्स' या मोहिमेचा भाग होते. यावेळी कोहली आणि अनुष्काने चाहत्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

anushka sharma sledges virat kohli
anushka sharma sledges virat kohli

विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेरही चाहत्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. याचा प्रत्यय अनेकादा आला आहे. आता पुन्हा एकदा विराट कोहली एका व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

नुकतेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा पुमाच्या 'लेट देअर बी स्पोर्ट्स' या मोहिमेचा भाग होते. यावेळी कोहली आणि अनुष्काने चाहत्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

अनुष्काने केली विराटच्या सेलिब्रेशनची नक्कल

व्हिडिओमध्ये अनुष्का विराटच्या मैदानावरील सेलिब्रेशनची नक्कल करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तसेच. ती विराटला मजेशीर पद्धतीने छेडतानाही दिसत आहे. अनुष्का म्हणाली की, कधी कधी विराट विकेट घेणाऱ्या गोलंदाजापेक्षा जास्त आनंद साजरा करतो. यावर विराटची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती. अनुष्काच्या या सेलिब्रेशननंतर विराट म्हणाला की, 'या सर्व गोष्टी भावनेच्या भरात होत असतात. हे सारखं सारखं दाखवत जाऊ नका मला नंतर खूप लाज वाटते.'

अनुष्काची स्लेजिंग

यानंतर विराटच्या याच सेलिब्रेशन स्टाईलचा आधार घेत शोमध्ये अनुष्काला विराट कोहलीला स्लेज करण्यास सांगण्यात आले. अनुष्कानेही अत्यंत खुबीने विराटला स्लेज केले. यावेळी अनुष्का ही विकेट किपर झाली होती. अनुष्का म्हणाली की, आज २४ एप्रिल आहे. आज तरी धावा कर कोहली.'

अनुष्काच्या स्लेजिंगला विराटनेही त्याच्या स्टाईलमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिले. यानंतर सर्व प्रेक्षक हसू लागले. विराट प्रत्युत्तरात म्हणाला की, ‘तुझ्या संघाने एप्रिल, मे, जून, जुलै महिने मिळून जेवढ्या धावा केल्या नसतील तेवढे सामने मी खेळले आहेत.’

विराटने यंदाच्या आयपीएलमध्ये ठोकल्या ६३९ धावा

या मोसमात विराट कोहलीचा उत्कृष्ट फॉर्म असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. बेंगळुरूने १४ पैकी ७ सामने जिंकले. तर त्यांना ७ सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. १४ गुणांसह आरसीबी गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. या मोसमात विराटच्या बॅटमधून ६३९ धावा निघाल्या. यात सलग दोन शतकांचाही समावेश आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलच्या तयारीसाठी विराट कोहली आता लंडनला गेला आहे.

WhatsApp channel