हिंदू दिनदर्शिकेनुसार, मार्गशीर्षानंतर पौष महिना येतो. हा हिंदू वर्षाचा १० वा महिना आहे. पौष महिन्यात सूर्यदेवाची उपासना करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. या महिन्यात सूर्यदेवाची उपासना केल्यास शुभ फळ मिळते. श्राद्ध कर्म आणि पिंडदानासाठीही पौष महिना अतिशय शुभ मानला जातो. यावर्षी पौष महिना शुक्रवार १२ जानेवारी २०२४ ते शुक्रवार ९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत चालणार आहे.
ऋतूनुसार सर्व महिन्याचे आणि सण-उत्सवाचे महत्व आहे. पौष महिना जेव्हा येतो तेव्हा हिवाळा ऋतू सुरू असतो, अशात थंडी वाढलेली असते. यामुळे या महिन्यात सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्व शास्त्रात सांगितले आहे. तसेच, गरम पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. पौष महिन्यात गृहप्रवेश, वास्तूशांती, साखरपुडा, लग्नकार्य, मुंज हे शुभ कार्य करू नये अशी मान्यता आहे. कारण या महिन्याला अध्यात्मिक दृष्ट्या खास मदहत्व आहे.
आदित्य पुराणानुसार पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी, लाल चंदन आणि लाल रंगाची फुले टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे आणि 'विष्णुवे नमः' मंत्राचा जप करावा. यासोबतच दिवसभर उपवास करावा आणि जेवणात मीठ वापरू नये. शक्य असल्यास, फक्त फळे खा. रविवारी उपवास करून सूर्याला तीळ-तांदळाची खिचडी अर्पण केल्याने मनुष्य तेजस्वी होतो. पुराणानुसार पौष महिन्यात तीर्थयात्रा, स्नान आणि दान केल्याने दीर्घायुष्य लाभते आणि रोग दूर होतात.
१२ जानेवारी २०२४ शुक्रवार - पौष मासारंभ, राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती(तारखेप्रमाणे)
१३ जानेवारी २०२४ शनिवार- पारशी शेहरेवार मासारंभ, मुस्लीम रज्जब मासारंभ
१४ जानेवारी २०२४ रविवार - विनायक चतुर्थी, धनुर्मास समाप्ती, भोगी
१५ जानेवारी २०२४ सोमवार - मकरसंक्रांती, मालैश्वर यात्रा- मारळ(रत्नागिरी)
१६ जानेवारी २०२४ मंगळवार- संक्रांत करिदिन, महादेव गोविंद रानडे पुण्यतिथी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेकदिन
१७ जानेवारी २०२४ बुधवार - गुरु गोविंदसिंह जयंती
१८ जानेवारी २०२४ गुरुवार - दुर्गाष्टमी, शाकंभरीदेवी नवरात्रोत्सवारंभ
२१ जानेवारी २०२४ रविवार - पुत्रदा एकादशी
२३ जानेवारी २०२४ मंगळवार - भौमप्रदोष, नेताजी सुभाष जयंती, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती
२४ जानेवारी २०२४ बुधवार - पौर्णिमा प्रारंभ रात्री ९ वाजून ४९ मिनिटांनी
२५ जानेवारी २०२४ गुरुवार - गुरुपुष्यामृतयोग, राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती (तिथीप्रमाणे) , शाकंभरी पौर्णिमा, शाकंभरीदेवी नवरात्र समाप्ती, माघस्नानारंभ, हजरत अली जन्मदिन
२६ जानेवारी २०२४ शुक्रवार - गणराज्य दिन
२८ जानेवारी २०२४ रविवार - लाला लजपतराय जयंती
२९ जानेवारी २०२४ सोमवार - संकष्ट चतुर्थी
३० जानेवारी २०२४ मंगळवार - महात्मा गांधी पुण्यतिथी, हुतात्मा दिन
३१ जानेवारी २०२४ बुधवार - राऊळ महाराज पुण्यतिथी
२ फेब्रुवारी २०२४ शुक्रवार - कालाष्टमी, स्वामी विवेकानंद जयंती (तिथिपूजा)
३ फेब्रुवारी २०२४ शनिवार - गुळवणी महाराज पुण्यतिथी
६ फेब्रुवारी २०२४ मंगळवार - षट्तिला एकादशी, संत निवृत्तीनाथ यात्रा(त्र्यंबकेश्वर)
७ फेब्रुवारी २०२४ बुधवार - प्रदोष
८ फेब्रुवारी २०२४ गुरुवार - शिवरात्री, मेरू त्रयोदशी (जैन)
९ फेब्रुवारी २०२४ शुक्रवार - दर्श अमावस्या, मौनी अमावस्या(जैन)