मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  VIRAL VIDEO : शिंक आली अन् तरुण जमिनीवर कोसळला; मित्रांसमोर युवकाचा तडफडून मृत्यू!

VIRAL VIDEO : शिंक आली अन् तरुण जमिनीवर कोसळला; मित्रांसमोर युवकाचा तडफडून मृत्यू!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 05, 2022 12:02 PM IST

Viral Video News : मित्रांसोबत चालताना एका तरुणाचा धक्कादायकरित्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर मित्राला वाचवण्यासाठी तरुणांनी धावपळ केली परंतु युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Meerut Viral Video
Meerut Viral Video (HT)

Meerut Viral Video : व्यक्तीचा मृत्यू कधी आणि कोणत्या क्षणी होईल, हे निश्चित नसतं. मृत्यूसाठी फक्त काही ना काही निमित्त हवं असतं, याची प्रचिती मेरठमधील काही तरुणांना आली आहे. रात्री मित्रांसोबत गप्पा मारत चालत असलेल्या एका तरुणाला शिंक आल्यानंतर धक्कादायकरित्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून या घटनेबाबत अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. याशिवाय जीवलग मित्रानं आपल्या डोळ्यांदेखत प्राण सोडल्यानं तरुणांवरही दुखाचा डोंगर कोसळला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातल्या एका गल्लीत चार मित्र एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून चालत-चालत गप्पा मारत होते. यावेळी त्यांच्यापैकी एका तरुणाला शिंक आली आणि तो रस्त्यावर कोसळला. यावेळी त्याच्यासोबत चालणाऱ्या तरुणांना नेमकं काय झालं हेच कळलं नाही. तरुण जमिनीवर कोसळल्यानंतर त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तरुणांनी त्याला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं प्रयत्न केला. परंतु तरुणाच्या छातीत त्रास वाढल्यानंतर मित्रांच्या डोळ्यांदेखत त्यानं अखेरचा श्वास घेतला. ही थरारक घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यात नेमकं काय झालंय, हे स्पष्ट दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मित्र जमिनीवर कोसळल्याचं पाहून तरुणांनी आरडाओरड केल्याचं दिसत आहे. याशिवाय काही युवकांनी तरुणाला उचलून घरात नेलं. त्यानंतर त्याला एका दुचाकीवर बसवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु त्याचा घटनास्थळीच मृत्यू झालेला होता. मेरठमधील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तरुणाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं आहे. परंतु आता या घटनेमुळं कोणत्या व्यक्तीचा, कधी आणि कोणत्या कारणामुळं मृत्यू होईल, हे निश्चित नसल्याचं सिद्ध झालं आहे. याशिवाय तरुणांनी जीवलग मित्राचा मृत्यू डोळ्यांदेखत पाहिल्यानं सोशल मीडियावर अनेकांचे डोळे पाणावल्याचं पाहायला मिळालं.

IPL_Entry_Point