मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rims Hospital Ranchi : तब्बल पाच मुलांना जन्म देऊनही महिला ठणठणीत, बाळांचीही प्रकृती स्थिर

Rims Hospital Ranchi : तब्बल पाच मुलांना जन्म देऊनही महिला ठणठणीत, बाळांचीही प्रकृती स्थिर

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 23, 2023 03:47 PM IST

Viral News Today Marathi : महिलेने पाच बाळांना जन्म दिल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. अनेकांनी बाळांचे फोटो शेयर करत त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.

Ranchi Jharkhand Viral News
Ranchi Jharkhand Viral News (HT)

Ranchi Jharkhand Viral News : झारखंडची राजधानी रांची येथील रीम्स रुग्णालयात एका महिलेने तब्बल पाच मुलांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. महिलेची यशस्वीरित्या प्रसूती झाली असून आईसह पाचही बाळांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. याबाबत रिम्स रुग्णालयाने ट्वीटरवर या घटनेची माहिती दिली आहे. याशिवाय नवजात बाळांचाही फोटो रुग्णालय प्रशासनाने शेयर केला आहे. आई आणि पाचही बाळ निरोगी असून रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याची माहिती आहे. त्यामुळं आता अनेकांनी सोशल मीडियावर नवजात बाळांचे फोटो शेयर करत त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड येथील चतरा जिल्ह्यातील विवाहित महिलेला काही दिवसांपूर्वीच रांचीतील रिम्स रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. महिला एकापेक्षा जास्त बाळांना जन्म देणार असल्याचं समजताच रुग्णालय प्रशासनाने तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावलं होतं. त्यानंतर महिलेने पाच बाळांना जन्म दिला असून नवजात बाळांचं वजन सामान्य बाळांच्या तुलनेत कमी असल्याची माहिती आहे. याशिवाय डॉक्टरांनी एनआयसीयूतील निओनॅटोलॉजी विभागात नवजात बाळांना दाखल केलं आहे. महिला आणि बाळांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टर्स लक्ष ठेवून असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

रिम्स रुग्णालयात महिलेने जन्म दिलेल्या बाळाचं वजन एक ते सव्वा किलो असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय महिलेला कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. त्यामुळं रुग्णालय प्रशासनाने सर्वांची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच रिम्स रुग्णालयात एका महिलेने चार मुलांना जन्म दिला होता. त्यावेळी देखील सर्व बाळांची प्रकृती स्थिर होती. काही दिवस उपचार केल्यानंतर आईसहित बाळांना घरी पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर आता चतरा येथील महिलेने पाच बाळांना जन्म दिल्यानंतर त्यांनाही लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं रिम्स रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

IPL_Entry_Point