मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  OYO Rooms Uttar Pradesh : ओळखपत्र नसताना ओयोमध्ये मौजमस्ती करायचे, पोलिसांची रेड पडताच...

OYO Rooms Uttar Pradesh : ओळखपत्र नसताना ओयोमध्ये मौजमस्ती करायचे, पोलिसांची रेड पडताच...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 23, 2023 02:56 PM IST

OYO Rooms Uttar Pradesh : ओयोच्या रुम्समध्ये अनेक दिवस मौजमस्ती करणाऱ्या कपल्सला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

OYO Company Rooms News
OYO Company Rooms News (HT)

OYO Company Rooms News : सध्याच्या काळात अनेक अविवाहित तरुण-तरुणी ओयो रुम्समध्ये स्टे करत आहे. त्यावरून अनेकदा देशातील अनेक राज्यांमध्ये वाद झालं होतं. परंतु आता ओयो रुम्समध्ये अतिशय धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील इटावाच्या सिविल लाइन परिसरातील ओयो हॉटेलमध्ये आयडी कार्डशिवाय मौजमस्ती करणाऱ्या १० जोडप्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इटाव्यातील अनुभव हॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेल मॅनेजरला झालेल्या मारहाणीच्या घटनांचा तपास करण्यासाठी पोलीस ओयोत दाखल झाले होते. त्यावेळी आयडी कार्ड नसताना अनेक जोडपे आतमध्ये मौजमस्ती करत असल्याचं उघडकीस आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील सिव्हील लाईन परिसरात एका ओयो कंपनीच्या हॉटेलमध्ये काही तरुणांनी मॅनेजरला बेदम मारहाण करत त्याच्याकडील रोकड लुटली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी १० जोडपे आयडी कार्ड नसताना मौजमस्ती करत असल्याचं पोलिसांना लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलमधील रजिस्टर जप्त केलं असून जोडप्यांना आयडी कार्ड सादर करण्यासाठी २४ तासांचा कालावधी दिला आहे. आत थांबलेले तरुण पोलिसांसमोर आले आहे, परंतु तरुणी मात्र हॉटेलबाहेर आल्या नाही, त्यामुळं पोलिसांनी फक्त तरुणांचीच चौकशी केली.

इटावा पोलिसांनी आरोपी तरुणांची नाव लिहून घेतली असून त्यांची चौकशी केली जात आहे. तरुण-तरुणींनी अद्यापही आयडी कार्ड जमा केले नसल्यामुळं हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपी जोडप्यांनी आयडी कार्ड सादर न केल्यास त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. इटाव्यातील या घटनेमुळं सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय अनेकांनी या घटनेवर उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

IPL_Entry_Point