मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi : ट्रिम दाढी, अंगात कोट… राहुल गांधींचा नवा लूक पाहिलात का?

Rahul Gandhi : ट्रिम दाढी, अंगात कोट… राहुल गांधींचा नवा लूक पाहिलात का?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 01, 2023 10:42 AM IST

Rahul Gandhi in New look : भारत जोडो यात्रेत लांबलचक दाढीत वावरणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नवा फ्रेश लूक समोर आला आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi

गेल्या काही महिन्यांपासून लांबलचक दाढीत वावरत असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा नवा फ्रेश लूक समोर आला आहे. ट्रिम दाढी आणि अंगात कोट व टाय घातलेल्या राहुल यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो लंडनमधील असल्याचं सांगितलं जात आहे.

जवळपास तीन महिने चालेलल्या कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात बरेच बदल झालेले अनुभवायला मिळाले. त्यापैकी एक बाह्य बदल म्हणजे त्यांचा लूक. संपूर्ण यात्रेत राहुल गांधी हे वाढलेल्या दाढीत व पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसत होते. याबद्दल पत्रकारांनी अनेकदा त्यांना विचारणाही केली होती. त्यांच्या दाढीची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड काळात वाढवलेल्या दाढीशी करण्यात आली होती. ते पंतप्रधानांची कॉपी करत असल्याचंही बोललं गेलं. मात्र, राहुल यांनी त्यावर मौन बाळगलं होतं.

यात्रा संपल्यानंतर ते दाढी काढून पुन्हा नव्या लूकमध्ये सामोरे येतील, असं बोललं जात होतं. मात्र, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही ते त्याच लूकमध्ये दिसले. त्यानंतर आता अचानक त्यांचा दाढी ट्रिम केलेला फोटो समोर आला आहे. राहुल गांधी हे केंब्रिज विद्यापीठात ‘लर्निंग टू लिसन इन द २१ सेंचुरी' या विषयावर व्याख्यान देणार आहेत. ते अनिवासी भारतीयांशी संवाद साधणार आहेत.

भारत जोडो यात्रेत कडाक्याच्या थंडीतही राहल गांधी केवळ एका टी-शर्टवर होते. त्याबाबत विचारलं असता, देशातील अनेकांना थंडीतही कपडे मिळत नाहीत. ते कुठल्या परिस्थितीत राहतात हे मला समजून घ्यायचं आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. केवळ काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत असताना राहुल यांनी कोट परिधान केला होता. त्यानंतर त्यांनी बहीण प्रियांकासोबत गुलमर्गमध्ये स्कीइंगचा आनंद लुटला. आता ते सात दिवसांच्या दौऱ्यावर ब्रिटनला पोहोचले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग