मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bharat Jodo 2.0 : राहुल गांधी सुरू करणार ‘भारत जोडो’ पार्ट-२, यावेळी पूर्व ते पश्चिम असणार पदयात्रा

Bharat Jodo 2.0 : राहुल गांधी सुरू करणार ‘भारत जोडो’ पार्ट-२, यावेळी पूर्व ते पश्चिम असणार पदयात्रा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 27, 2023 06:59 PM IST

bharatjodoyatra part 2 : भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली काँग्रेसने सुरू केल्या असून यावेळी यात्रेचा मार्ग पूर्व ते पश्चिम म्हणजे अरुणाचल प्रदेश ते गुजरात असा असणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारत जोडो यात्रा
भारत जोडो यात्रा

नवी दिल्ली - काँग्रेस भारत जोडो यात्रा पार्ट-२ सुरू करण्याच्या तयारीत आहे. दक्षिण ते उत्तर अशी पदयात्रा पूर्ण केल्यानंतर आता देशाच्या पूर्व ते पश्चिम अशी ही पदयात्रा असेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही यात्रा अरुणाचल प्रदेशमधील पासीघाट येथून सुरू होऊन गुजरात राज्यातील पोरबंदरपर्यंत काढली जाईल. काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही रायपूरमध्ये सुरू असलेल्या पक्षाच्या ८५ व्या महाअधिवेशनमध्ये आपल्या भाषणातून याचे संकेत दिले होते. 

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, 'तपस्या' पुढे नेण्यासाठी त्यांनी कार्यक्रम तयार करावा. त्यामध्ये भाग घेण्यासाठी सर्व कार्यकर्ते तयार आहेत. राहुल गांधी यांनी अनेक वेळा भारत जोडो यात्रेला तपस्या नाव दिले आहे. रायपूर येथील काँग्रेस महाअधिवेशन समारोपानंतर जयराम रमेश यांनी म्हटले की, शक्यता आहे की, भारत जोडो यात्रा यावेळी अरुणाचल प्रदेशातील पासीघाटपासून सुरू होऊन गुजरात राज्यातील पोरबंदर येथे यात्रा विसर्जित होईल. या यात्रेबाबत सर्वांमध्ये उत्साह आहे. त्यांनी म्हटले की, माझे वैयक्तिक मत आहे की, या यात्रेची गरज आहे. 

जयराम रमेश यांनी पदयात्रेच्या बाबत म्हटले की, ही यात्रा दक्षिण ते उत्तरकडून काढण्यात आलेल्या पदयात्रेहून वेगळी असेल. होऊ शकते की, ही यात्र पहिल्यासारखी व्यापक नसेल. येत्या काही आठवड्यात यात्रेचे स्वरुप निश्चित केले जाईल. ईशान्येकडील भौगोलिक परिस्थिती व हवामान लक्षात घेऊन या यात्रेसाठी वेगवेगळे परिवहन माध्यमांचा वापर होऊ शकते. मात्र ही यात्रा पदयात्रेच्या स्वरुपातच असेल. 

रमेश यांनी सांगितले की, या यात्रेत सहभागी पदयात्रेकरुंची संख्या पहिल्यापेक्षा कमी असू शकते. भारत जोड़ो यात्रा मागच्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी सुरू झाली होती. जवळपास ३५०० किलोमीटर अंतर कापून ही पदयात्रा ३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये पोहोचली होती. या यात्रेतून राहुल गांधी यांची नवी प्रतिमा तयार झाली व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.

IPL_Entry_Point