मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  G-20 संमेलनासाठी आणलेल्या फुलांच्या कुंड्यांची चोरी, आलिशान गाडीतून आले चोर; पाहा VIDEO

G-20 संमेलनासाठी आणलेल्या फुलांच्या कुंड्यांची चोरी, आलिशान गाडीतून आले चोर; पाहा VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 01, 2023 10:43 AM IST

Stealing flower pots arranged for G20 summit : गुरुग्राममध्येG-20परिषदेसाठी सुशोभिकरणासाठी ठेवलेली फुलांची रोपटी चोरीला गेली आहेत.या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

फुलांच्या कुड्यांची चोरी
फुलांच्या कुड्यांची चोरी

हरियाणातील गुरुग्राममध्ये G-20 परिषदेसाठी सुशोभिकरणासाठी ठेवलेली फुलांची रोपटी चोरीला गेली आहेत. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रिपोर्टनुसार, एक मिनिट ७ सेकंदाची ही व्हिडिओ क्लिप गुरुग्राममधील शंकर चौकातील आहे. या क्लिपमध्ये, कारजवळ दोन लोक दिसत आहेत जे एकामागून एक फुलांची रोपटी उचलून त्यांच्या कारच्या डिक्कीत ठेवत आहेत. या कारला व्हीआयपी नंबर प्लेट आहे, ज्याची किंमत सुमारे ४० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गुरुग्राम मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटीचे जॉइंट सीईओ एसके चहल यांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले,  'हा व्हायरल व्हिडिओ आमच्या निदर्शनास आला आहे. आरोपींवर निश्चितच कारवाई केली जाईल. या व्हिडिओला ट्विटरवर ३,७०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि जवळपास ५ लाख व्ह्युज मिळाल्या आहेत. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी अनेक नेटीझन्स करत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

 

एका यूजरने लिहिले की,असे लोक४०लाख रुपयांची कार खरेदी करतात पण रोपांसाठी ४० रुपये खर्च करू इच्छित नाहीत. आणखी एका व्यक्तीने लिहिले की,या गाडीसोबत इतकी रोपे मोफत मिळायला हवीत.

१ ते ४ मार्च दरम्यान गुरुग्राममध्ये G-20 ची बैठक -
१ ते ४ मार्च दरम्यान हरियाणाच्या गुरुग्राममध्ये G-20 कार्यगटाची बैठक होणार आहे. या कार्यक्रमात ३९ देशांचे प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे,जिथे ते त्यांच्या देशांतील भ्रष्टाचारविरोधी उपायांवर चर्चा करतील. या दरम्यान भ्रष्टाचार रोखण्यात त्यांना कितपत यश आले आहे, यावर चर्चा होऊ शकते.

IPL_Entry_Point

विभाग