मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Crime News : विद्यापीठात विदेशी तरुणीवर विनयभंगाचा प्रयत्न; आरोपी प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल

Crime News : विद्यापीठात विदेशी तरुणीवर विनयभंगाचा प्रयत्न; आरोपी प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 03, 2022 01:01 PM IST

Molestation Case In University : विद्यापीठात शिकणाऱ्या एका विदेशी तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणानंतर विद्यार्थांनी विद्यापीठात आंदोलन सुरू केलं आहे.

Molestation Case In Hyderabad Central University
Molestation Case In Hyderabad Central University (HT_PRINT)

Molestation Case In Hyderabad Central University : विद्यापीठात शिकणाऱ्या एका विदेशी विद्यार्थीवर प्राध्यापकाकडूनच विनयभंगाचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं हैदराबादेतील केंद्रीय विद्यापीठात खळबळ उडाली असून आरोपी प्राध्यापकाला अटक करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये आंदोलन करायला सुरुवात केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी विद्यार्थीनीच्या तक्रारीवरून आरोपी प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादेतील केंद्रीय विद्यापीठात हा धक्कादायक प्रकार घडला असून पीडित विद्यार्थींनी ही थायलंडची आहे. शुक्रवारी कॅम्पसमध्ये फॅकल्टीची वीकेंड पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आरोपी प्राध्यापकानं थायलंडच्या एका विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पीडित विदेशी तरुणीनं विरोध करण्याचा प्रयत्न केला असता नराधम प्राध्यापकानं विद्यार्थीनीला मारहाण केली. त्यानंतर विद्यार्थीनीनं आज सकाळी घडलेल्या प्रकाराबाबत शहरातील गचीबोवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी प्राध्यापक हा विद्यार्थीचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पीडित तरुणीनं तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

घडलेल्या प्रकारावरून विद्यापीठातील विद्यार्थी आक्रमक...

विद्यापीठातीलच एका प्राध्यापकानं विदेशी तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थी आक्रमक झाले असून त्यांनी कॅम्पसमध्ये आंदोलन सुरू केलं आहे. आरोपी प्राध्यापकाला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. कॅम्पसमध्ये घडलेल्या या प्रकाराबाबत विद्यापीठ प्रशासनानं अजून कोणतीही भूमिका न घेतल्यानंही विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून कॅम्पसमध्ये येऊन प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केल्याची माहिती आहे.

IPL_Entry_Point