मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mann Ki Baat: बाजरीचं सेवन योगाएवढंच गरजेचं; नववर्षाच्या पहिल्या ‘मन की बात’मधून मोदींचा आरोग्यमंत्र

Mann Ki Baat: बाजरीचं सेवन योगाएवढंच गरजेचं; नववर्षाच्या पहिल्या ‘मन की बात’मधून मोदींचा आरोग्यमंत्र

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 29, 2023 01:58 PM IST

Mann Ki Baat today : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षातील पहिल्याच 'मन की बात' या कार्यक्रमातून लोकांना आहाराविषयी आणि आरोग्याविषयी जागरुक होण्याचं आवाहन केलं आहे.

PM Narendra Modi 'Mann Ki Baat' 97th episode
PM Narendra Modi 'Mann Ki Baat' 97th episode (HT)

PM Narendra Modi 'Mann Ki Baat' 97th episode : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षात पहिल्यांदाच 'मन की बात' कार्यक्रम घेत लोकांना आरोग्य आणि आहाराबाबत जागरुकता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा ९७ वा एपिसोड पार पडला असून त्यात पीएम मोदी बोलताना म्हणाले की, प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर मी साहसी परेड होताना पाहिलं. अनेक लोकांनी माझ्याशी चर्चा करत प्रजासत्ताक दिन उत्सवासारखा साजरा केला गेल्याचं सांगितलं. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील बाजरी उत्पादन करणाऱ्या शेतकरी वर्गाचं कौतुक केलं आहे.

या वर्षीच्या पहिल्याच मन की बात मध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, बाजरीचं सेवन करणं हे आरोग्यासाठी प्रचंड गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं योगा करणं हे आपल्या आरोग्यासाठी गरजेचं आहे तसंच बाजरीचं सेवन करणं हे आपल्या आहारासाठी आणि जीवनशैलीसाठी आवश्यक असल्याचं मोदी म्हणाले. सध्याच्या काळात जगातील अनेक देशांना बाजरीचं महत्त्व समजत असून त्याची मागणीही सातत्यानं वाढत असल्याचं दिसून येत आहे. ओडिशात बाजरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जात असून तेथील बाजरी जागतिक बाजारात नेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मोदींनी मन की बात कार्यक्रमात बोलताना सांगितलं आहे.

ओडिशात अनेक लोक बाजरीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेताहेत. याबाबत अनेक लोकांची नावं सध्या चर्चेत आहेत. ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यात एक हजार महिलांनी ग्रुप करत बाजरीचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. या महिला केवळ बाजरीचं उत्पान घेत नाहीयेत. तर बाजरीपासून कुकीज, गुलाबजामून आणि केक तयार करत आहेत. त्यामुळं अनेक महिलांच्या हाताला काम मिळालं असून त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत असल्याचं सांगत पीएम मोदींनी आदिवासी महिलांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.

IPL_Entry_Point