मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Vaccine : नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीची किंमत फिक्स; एका डोससाठी मोजावे लागतील इतके रुपये

Vaccine : नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीची किंमत फिक्स; एका डोससाठी मोजावे लागतील इतके रुपये

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 27, 2022 01:03 PM IST

Booster Dose Nasal Vaccine Price : भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेल्या इंट्रानेजल वॅक्सीनची किंमत फिक्स केली आहे. त्यामुळं आता लवकरच ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे.

Booster Dose Nasal Vaccine Price
Booster Dose Nasal Vaccine Price (HT)

Bharat Biotech Nasal Vaccine Price : भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेल्या इंट्रानेजल वॅक्सीन iNCOVACC या कोरोना लसीच्या बूस्टर डोसला केंद्र सरकारनं वापराची परवानगी दिली आहे. त्यानंतर आता ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत जगभरात ज्या लसी बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत, त्या सर्व इंजेक्शनद्वारे देण्यात येत होत्या. परंतु आता भारत बायोटेकची ही लस नाकावाटे देण्यात येत असून त्याचा परिणामही चांगला असल्यानं या लसीची बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु आता ही लस किती रुपयांना मिळणार, याची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, भारत बायोटेकच्या नेझल कोरोनो लसीच्या एका डोसची किंमत ८०० रुपये असणार आहे. याशिवाय रुग्णालयाचा जीएसटी चार्ज किमतीच्या पाच टक्के म्हणजे २०० रुपये असेल. अशा प्रकारे एक हजार रुपयांना नाकावाटे देण्यात येणाऱ्या या लसीचा डोस मिळणार आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत इंट्रानेजल वॅक्सीन iNCOVACC ही लस बाजारात उपलब्ध होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कॉवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना या लसीचे बूस्टर डोस घेता येणार आहे.

मनीकंट्रोल या इंग्रजी वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, खाजगी रुग्णालयांना या लसीच्या एका डोससाठी १५० रुपये आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं ही रक्कम एकत्र केली तर प्रतिडोस ९५० ते १००० रुपये लोकांना लसीसाठी मोजावे लागणार आहेत. नेझल कोरोनो वॅक्सिन भारत बायोटेक कंपनी आणि अमेरिकेतील वॉश्गिंटन विद्यापीठात विकसित करण्यात आली आहे.

नाकावाटे देण्यात येणारी लस म्हणजे नेझल वॅक्सिन, त्याला इंट्रानेझल वॅक्सिन असंही म्हटलं जातं. इंजेक्शनमार्फत देण्यात येणाऱ्या लसीला इंट्रानेझल वॅक्सिनला पर्याय म्हणून समोर आणलं गेलं आहे. त्यामुळं ज्या लोकांना इंजेक्शनद्वारे लस घेणं आवडत नाही, अशा लोकांना नाकाद्वारे लस घेणं उत्तम पर्याय ठरणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळं जगभरात खबरदारी घेतली जात आहे. केंद्र सरकारनंही देशातील सर्व राज्यांना नियमावली जारी करण्याच्या सूचना केल्या आहेत.

IPL_Entry_Point