मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Patna High Court Issued Order To Immediately Stop Caste Wise Census In Bihar Today

Caste Census Bihar : बिहारमधील जातनिहाय जनगणना तात्काळ थांबवा, पाटणा हायकोर्टाचे आदेश

Patna High Court Stop Caste Wise Census Bihar
Patna High Court Stop Caste Wise Census Bihar (HT)
Atik Sikandar Shaikh • HT Marathi
May 04, 2023 04:49 PM IST

Caste Wise Census Bihar : बिहारमध्ये होत असलेल्या जातनिहाय जनगणनेबाबत हायकोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे.

Patna High Court Stop Caste Wise Census Bihar : गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी राजद-जेडीयू आणि भाजपात जोरदार कलगीतुरा रंगला होता. राजकीय वादानंतर बिहार सरकारने राज्यात जातनिहाय जनगणना सुरू केली होती. त्यानंतर आता बिहारमध्ये होत असलेल्या जातनिहाय जनगणनेला तात्काळ स्थगिती देण्याचा आदेश पाटणा हायकोर्टाने दिला आहे. त्यामुळं आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारला मोठा धक्का बसला आहे. पाटणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश विनोद चंद्रन यांनी जातनिहाय जनगणनेला थांबवण्याचे आदेश जारी केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बिहारमध्ये होत असलेल्या जातनिहाय जनगणनेविरोधात पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर गेल्या दोन दिवसांपासून सुनावणी सुरू होती, सुनावणी संपल्यानंतर न्यायाधीशांनी आज या प्रकरणात निकाल देत जातनिहाय जनगणना थांबवण्याचा आदेश बिहार सरकारला दिला आहे. सरकारच्या प्रतिनिधींनी जातनिहाय जनगणनेबाबत आतापर्यंत जमा केलेली माहिती नष्ट करू नये, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. त्यानंतर आता जमा केलेली माहिती बिहार सरकारकडून हायकोर्टात सादर केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Brij Bhushan Singh : बलात्काराच्या आरोपानंतर बृजभूषण सिंह यांच्याबाबत भाजपचा मोठा निर्णय

बिहारमधील जातनिहाय जनगणना ही एकमताने करण्यात येत होती. त्याला आम्ही रितसर केंद्रातील मोदी सरकारकडून परवानगी घेतली. यापूर्वी संपूर्ण देशामध्ये जातनिहाय जणगणना करण्याची आमची मागणी होती, परंतु त्यास केंद्र सरकारने नकार दिल्यानंतर आम्ही बिहारमध्ये जातनिहाय जनगणना-सह-आर्थिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता, असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.

WhatsApp channel