मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Brij Bhushan Singh : बलात्काराच्या आरोपानंतर बृजभूषण सिंह यांच्याबाबत भाजपचा मोठा निर्णय

Brij Bhushan Singh : बलात्काराच्या आरोपानंतर बृजभूषण सिंह यांच्याबाबत भाजपचा मोठा निर्णय

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 04, 2023 04:45 PM IST

Brij Bhushan Singh UP : महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्यानंतर भाजपाने खासदार बृजभूषण सिंह यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Brij Bhushan Sharan Singh Uttar Pradesh
Brij Bhushan Sharan Singh Uttar Pradesh (HT_PRINT)

Brij Bhushan Sharan Singh Uttar Pradesh : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंवर बलात्कार केल्याचा आरोप करत कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळं आता बृजभूषण यांच्या अडचणी वाढत असतानाच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश भाजपाने खासदार बृजभूषण सिंह यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळं आता बृजभूषण यांच्यावर मोठी कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महिला कुस्तीपटूंवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर भाजपाने बृजभूषण सिंह यांना प्रचारापासून दूर ठेवलं आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अयोध्या, गोंडा आणि कैसरगंज जिल्ह्यातील निवडणुकीच्या प्रचारात बृजभूषण कुठेही दिसलेले नाहीत. उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि खासदारांना भाजपने निवडणुकीच्या प्रचारात उतरवलं असलं तरी बृजभूषण सिंह मात्र प्रचारापासून लांब असल्याचं चित्र आहे. त्यामुळं आता बृजभूषण यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यूपीतील स्थानिक भाजपचे नेते बृजभूषण यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे.

बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंवर दिल्ली पोलिसांनी हल्ला केल्याचा आरोप साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी केला आहे. या प्रकरणाचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळं आता कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून दिल्लीत राजकीय वाद पेटला आहे. त्यातच आता भाजपानेही बृजभूषण शरण सिंह यांना प्रचारापासून लांब ठेवल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IPL_Entry_Point