नागालँडचे पर्यटन आणि उच्च शिक्षण मंत्री (Nagaland's Tourism and Higher Education Minister) तेमजेन इम्ना अलॉन्ग (Temjen Imna Along) इंटरनेटवरील लोकप्रिय राजकीय नेते आहेत. आपल्या हटके व गंमतीशीरसोशल मीडिया पोस्टसाठी प्रसिद्ध आहेत. यावेळी मंत्र्यांनी पुन्हा एकदा आपल्या एक्स फॉलोअर्सचे लक्ष वेधण्यासाठी एक गंमतीशीर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ते एका तलावाच्या पाण्यात अडकल्याचे दिसत आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी तीन लोक संघर्ष करत असल्याचे दिसत आहे. त्यांनी लोकांना वाहनाच्यासुरक्षा मानकांना समजण्यासाठी खरेदी करण्यापूर्वी कारची एनसीएपी (न्यू कार असेसमेंट प्रोग्राम) रेटिंगची तपासणी करण्याचा सल्ला देण्यासाठी ही गंमतीशीर पोस्ट शेअर केली आहे.
इनमा अलॉन्ग यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आज जेसीबीची टेस्ट होती! नोट: हे सर्व एनसीएपी रेटिंगबाबत आहे. गाडी खरेदी करण्यापूर्वी एनसीएपी रेटिंग जरूर बघा. कारण हे आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे.
क्लिपमध्ये दिसते की, इनमा अलॉन्ग चिखलाने भरलेल्या तलावातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एक व्यक्ती त्यांना मागून धक्का देत आहे तर दोन जण समोरून त्यांना ओढत आहेत. दरम्यान मंत्री महोदय चिखलात वारंवार घसरून पडत आहेत. त्यानंतर ते मध्येच थांबतात मात्र काही प्रयत्नांनतर ते तलावातून बाहेर येतात. त्यांनी काही लोकांना धन्यवाद दिले ज्यांनी त्यांना तलावातून बाहेर येण्यास मदत केली.
इनमा अलॉन्ग यांनी शेअर केलेली क्लिप आतापर्यंत १५६,००० हून अधिक वेळा पाहिली गेली असून १० हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. एकाने कमेंट केली आहे की, आम्हाला देशात अशाच राजकीय नेत्याची गरज आहे. हा व्हिडिओ पाहून एक सेंकदही असे वाटत नाही की, ते भारतातील मोठे राजकीय नेते आहेत. तर ते सामान्य लोकांप्रमाणे आपल्या माणसांसोबत आनंद घेत आहेत. मातीशी जोडलेले नेते आहेत@AlongImna.